Dog Attack in Hubli: कर्नाटकातील हुबळी शहरात एका भटक्या पाळीव कुत्र्याने 30 हून अधिक जणांवर हल्ला करून त्यांचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे. जखमींपैकी 16 हून अधिक लोकांना त्याच्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्याने हल्ल्यात त्यांना गंभीर जखमी केले होते. अनेकांचा यात मोठा रक्तस्त्राव झाला होता. (Ghaziabad Court Room: भर कोर्टात न्यायाधीश आणि वकीलांमध्ये राडा; पोलिसाचा लाठीचार्ज, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल (See Pics and Video))
हुबळी येथील गोकुळा रोडवरील अक्षय पार्क परिसरात सोमवारी दुपारी ही घटना घडली. कुत्रा हा पाळीव होता. मात्र, त्याच्या मालकाने त्याला सोडून दिले होते. जेव्हा त्याला पकडण्यात आले. तेव्हा त्याच्या गळ्यात कॉलर आणि साखळी होती. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने गजबजलेल्या गोकुळा रोडवर एकजणावर हल्ला केला होता. यात त्या व्यक्तीला मोठी दुखापत झाली होती. ती व्यक्ती रूग्णालयात रक्ताने माखलेले कपडे घालून उपचारासाठी आली होती.
गंगाधरा कपलादिनी या पीडित महिलेने सांगितले की, 'ऑफिसला जात असताना माझे वाहन पार्क करत होते तेव्हा लोक अचानक ओरडू लागले. एक कुत्रा माझ्याकडे धावत आला. मी प्रतिकार करण्यापूर्वीच तो आला आणि माझ्या मांडीवर आणि पायावर त्याने चावा घेतला.' 'याआधी, व्हॉलीबॉल खेळत असलेल्या 8 ते 10 लोकांना त्याने चावा घेतला होता. त्यानंतर इतर अनेक नागरिकांचा चावा त्याने घेतला होता. कुत्र्याने शाळकरी मुलांवरही हल्ला केला.