Amit Shah on Naxalites: आता पावसाळ्यातही नक्षलवाद्यांना आराम मिळणार नाही; अमित शहांचा नक्षलवाद्यांना इशारा

आता पावसाळ्यातही नक्षलवाद्यांना आराम मिळणार नाही, कारण संपूर्ण पावसाळ्यात नक्षलविरोधी कारवाई सुरूच राहील. नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत, असं आवाहन अमित शहा यांनी केली आहे.

Amit Shah on Naxalites: आता पावसाळ्यातही नक्षलवाद्यांना आराम मिळणार नाही; अमित शहांचा नक्षलवाद्यांना इशारा
Amit Shah (फोटो सौजन्य - X/@airnews_mumbai)

Amit Shah on Naxalites: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध निर्णायक लढाईची घोषणा केली आहे. अमित शहा यांनी म्हटलं आहे की, आता पावसाळ्यातही नक्षलवाद्यांना आराम मिळणार नाही, कारण संपूर्ण पावसाळ्यात नक्षलविरोधी कारवाई सुरूच राहील. नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत. छत्तीसगड सरकारने नक्षलवाद्यांसाठी एक उत्कृष्ट आत्मसमर्पण धोरण बनवले आहे आणि ही आत्मसमर्पण करण्याची सर्वोत्तम संधी आहे. केंद्र आणि राज्य सरकारे वेगाने एकत्र काम करत आहेत. 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचे लक्ष्य आहे. सुरक्षा दल आता हवामानाच्या आधारे नव्हे तर मोहिमेच्या आधारे ऑपरेशन करतील, असा इशाराही अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना दिला आहे.

अमित शहांचा नक्षलवाद्यांना इशारा -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 4626 05:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).