Nalasopara Gang Rape: इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघा अल्पवयीनांना अटक

नालासोपारा पूर्व परिसरात इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन १७ वर्षीय मुलांनी सामूहिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Nalasopara Gang Rape: इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघा अल्पवयीनांना अटक
Rape Case (Photo Credit- Pixabay)

नालासोपारा पूर्व परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही १७ वर्षीय अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

इन्स्टाग्रामवरील मैत्री आणि घटनाक्रम

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची इन्स्टाग्रामवर एका १७ वर्षीय मुलाशी ओळख झाली होती. ११ जुलै रोजी या मुलाने महत्त्वाचे काम असल्याचे सांगत तिला भेटण्यासाठी बोलावून घेतले. मुलगी भेटायला गेल्यानंतर तिला परिसरातील एका चाळीतील खोलीत नेण्यात आले. त्या ठिकाणी आरोपीचा दुसरा १७ वर्षीय मित्र आधीपासून उपस्थित होता. त्या दोघांनी मिळून मुलीवर अत्याचार केला आणि या संपूर्ण कृत्याचे मोबाईल फोनमध्ये चित्रीकरण केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 2026 02:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).