Ghaziabad Court Room: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वकील आणि न्यायाधीश (Court Clash) यांच्यात वादावादी झाली आणि नंतर प्रकरण पोलिसांच्या लाठीचार्जपर्यंत पोहोचले. पोलिसांनी कोर्ट रूममध्ये वकिलांवर लाठीमार (Lawyers Police Clash)केला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. वकील आणि न्यायाधीश यांच्यात काही मुद्द्यावरून वाद झाला आणि नंतर प्रकरण चिघळले, असे सांगण्यात येत आहे. यात काहीजण जखमीही झाले. (हेही वाचा:Medical Equipment आयातीवर प्रतिबंध लावा, वैद्यकीय उपकरण उद्योगाची केंद्र सरकारला विनंती )
मिळालेल्या माहितीनुसार, नाहरसिंग यादव वकील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित एका प्रकरणावर वाद घातला. वादावादीनंतर या प्रकरणाचे रुपांतर हाणामारीत झाले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती शांत होत नसल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला.
या लाठीचार्जमध्ये अधिवक्ता नाहर सिंह यादव आणि आणखी एक वकील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर न्यायालयातील कामकाज ठप्प झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गाझियाबादच्या जिल्हा न्यायालयात अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीस तैनात करण्यात आले असून न्यायाधीशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
भर कोर्टात न्यायाधीश आणि वकीलांमध्ये राडा
गाज़ियाबाद: जिला जज और वकीलों में जमकर हुई तू- तू मैं-मैं के बाद वकीलों ने जज के कमरे को घेरा। वकीलों पर पुलिस ने किया लाठी चार्ज। भारी पुलिसबल मौके पर मौजूद।@ghaziabadpolice pic.twitter.com/z9kdDuvdBW
— Aviral Singh (@aviralsingh15) October 29, 2024
वाद इतका वाढला की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी पोलीस आणि पीएसी बोलावल्यानंतर वकिलांवर लाठीचार्ज करण्यात आला. जिल्हा न्यायाधीश न्यायालयाच्या दालनात पोलिसांनी चारही बाजूंनी दरवाजा बंद करून मारहाण केल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. लाठीचार्ज केल्यानंतर वकील चांगलेच संतापले असून त्यांनी पोलीस चौकीची तोडफोडही केली. एकीकडे वकील संपावर बसले आहेत तर दुसरीकडे न्यायाधीशांनीही काम बंद केले आहे.