IND vs ENG 1st Test Day 2 Lunch Break: चोथ्या दिवशी लंचपर्यंत भारतीय संघ 150 पार; राहुल आणि पंतची शानदार फलंदाजी

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने चौथ्या दिवशी लंच पर्यंत 3 विकेट गमावून 153 धावा केल्या आहे. यासह भारताने 159 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून केएल राहुल 72 आणि ऋषभ पंत 31 धावांवर खेळत आहे. तर इंग्लंडकडून ब्रायडन कार्से 2 आणि बेन स्टोक्सने 1 विकेट घेतली आहे.

IND vs ENG 1st Test Day 2 Lunch Break: चोथ्या दिवशी लंचपर्यंत भारतीय संघ 150 पार; राहुल आणि पंतची शानदार फलंदाजी
Kl Rahul And Rishabh Pant (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test 2025) 20 जून (शुक्रवार) पासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जात आहे. आज खेळाचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दोन विकेट गमावल्यानंतर 90 धावा केल्या. त्याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 471 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने चौथ्या दिवशी लंचपर्यंत 3 विकेट गमावून 153 धावा केल्या आहे. यासह भारताने 159 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून केएल राहुल 72 आणि ऋषभ पंत 31 धावांवर खेळत आहे. तर इंग्लंडकडून ब्रायडन कार्से 2 आणि बेन स्टोक्सने 1 विकेट घेतली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).