Hot-Air Balloon Catches Fire: दक्षिण ब्राझीलमध्ये गरम हवेच्या फुग्याला आग; 8 जणांचा मृत्यू (Watch Video)

दक्षिण ब्राझीलमधील एका पर्यटन क्षेत्रात शनिवारी गरम हवेच्या फुग्याला आग लागली. यात आठ जणांचा आपला जीव गमवावा लागला. ही घटना सांता कॅटरिना राज्यातील प्रिया ग्रांडे या ग्रामीण भागात घडली.

Hot-Air Balloon Catches Fire: दक्षिण ब्राझीलमध्ये गरम हवेच्या फुग्याला आग; 8 जणांचा मृत्यू (Watch Video)
Hot-Air Balloon Catches Fire (फोटो सौजन्य - @Storylinexplore)

Hot-Air Balloon Catches Fire: दक्षिण ब्राझीलमधील (Southern Brazil) सांता कॅटरिना येथे गरम हवेच्या फुग्याला आग (Hot-Air Balloon Catches Fire) लागल्याने 8 जणांचा मृत्यू झाला. यात 21 जण होते, त्यापैकी 13 जणांना वाचवण्यात आले. राष्ट्रपती लुला यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, दक्षिण ब्राझीलमधील एका पर्यटन क्षेत्रात शनिवारी गरम हवेच्या फुग्याला आग लागली. यात आठ जणांचा आपला जीव गमवावा लागला. ही घटना सांता कॅटरिना राज्यातील प्रिया ग्रांडे या ग्रामीण भागात घडली, जे त्याच्या सुंदर दरीच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.

घटनास्थळी बचाव कार्य -

राज्याच्या लष्करी अग्निशमन सेवेनुसार, सकाळी 8 वाजता (स्थानिक वेळेनुसार) हवेत आग लागल्यानंतर फुगा कोसळला. यात बसलेल्या 21 जणांपैकी 13 जण वाचले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. बचाव कार्यात सुमारे 20 अग्निशमन दलाचे आणि सात आपत्कालीन वाहनांचा समावेश होता. (हेही वाचा -Mumbai Local Ladies Coach Fight Video: मुंबई लोकल मध्ये महिलांच्या डब्ब्यात झिंज्या उपटत तुंबळ मारहाणीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाकडू तपास सुरू)

अद्याप अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सांता कॅटरिनाचे गव्हर्नर जोर्गिन्हो मेलो यांनी याला एक दुर्दैवी घटना म्हटले आहे. तसेच त्यांनी घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. आम्ही शोकात आहोत. ही एक दुर्दैवी घटना आहे. हे कसे आणि का घडले याचा आम्ही शोध घेऊ, असे मेलो यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी पीडितांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त केला. तसेच बचाव आणि प्रतिसाद कार्यात संघीय आणि राज्य संस्था मदत करत असल्याची पुष्टी केली. तथापी, काही दिवसांपूर्वी साओ पाउलो राज्यात झालेल्या आणखी एका बलून अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तर 11 जण जखमी झाले होते.

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 01:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).