IND vs ENG 1st Test Day 4 Live Score Update: केएल राहुल आणि ऋषभ पंत बाद झाल्यानंतर टीम इंडिया डगमगली, इंग्लंडसमोर ठेवले 371 धावांचे लक्ष्य

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय 364 धावांवर सर्वबाद झाल आहे. यासह भारताने सहा धावांची आघाडी घेत इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले आहे दुसऱ्या डावात भारताकडून ऋषभ पंत आणि केएल राहुलने शानदार शतक झळकावले. तर इंग्लडकडून ब्रायडन कार्से आणि जोश टंगनेने प्रत्येतकी 3 विकेट घेतल्या.

IND vs ENG 1st Test Day 4 Live Score Update: केएल राहुल आणि ऋषभ पंत बाद झाल्यानंतर टीम इंडिया डगमगली, इंग्लंडसमोर ठेवले 371 धावांचे लक्ष्य
Kl Rahul And Rishabh Pant (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test 2025) 20 जून (शुक्रवार) पासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जात आहे. आज खेळाचा चौथा दिवस आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय 364 धावांवर सर्वबाद झाल आहे. यासह भारताने सहा धावांची आघाडी घेत इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले आहे दुसऱ्या डावात भारताकडून ऋषभ पंत आणि केएल राहुलने शानदार शतक झळकावले. तर इंग्लडकडून ब्रायडन कार्से आणि जोश टंगनने प्रत्येतकी 3 विकेट घेतल्या.

जयस्वाल, गिल आणि पंतचे दमदार शतक

त्याआधी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने सुरुवात चांगली केली आणि पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 471 धावा केल्या. भारताकडून यशस्वी जयस्वाल (101), कर्णधार शुभमन गिल (147) आणि ऋषभ पंतने (134) शतके झळकावली. तर केएल राहुलने 42 धावांचे योगदान दिले. गिल आणि पंतने मिळून 209 धावांची मोठी भागीदारी रचली. बाकी कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. तर जोश टंग आणि शोएब बशीर यांनी 1-1 विकेट मिळाली.

जसप्रीत बुमराहने घेतल्या पाच विकेट्स

त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडचा संघाने 10 विकेट गमावून 465 धावा केल्या. आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात काही खास झाली नाही. झॅक क्रॉली 4 धावा करुन बुमराहाचा बळी ठरला. पुढे पोप आणि डकेटने 122 धावांची भागीदारी रचली. इंगलंडकडून ऑली पोपने 106 धावा केल्या तर हॅरी ब्रूक 99 बाद झाला. जेमी स्मिथ 40 आणि ख्रिस वोक्स 38 धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने तीन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाने इंग्लंडला 465 धावांवर रोखले.

ऋषभ पंत आणि केएळ राहुचे शानदार शतक

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. जयस्वाल 4, सुदर्शन 30 आणि गिल 8 धावांवर माघारी परतले. त्यानंतर केएल राहुल आणि ऋषभ पंतने डाव सांभाळत 192 धावांची शानदार भागीदारी रचली. केएल राहुल 137 आणि ऋषभ पंतने 118 धावा केल्या आणि भारताचा स्कोर 364 धावांवर पर्यंत पोहचवला. भारताने 6 धावांची आघाडी घेतल्याने इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लडकडून ब्रायडन कार्से आणि जोश टंगनेने प्रत्येतकी 3 विकेट घेतल्या.

 

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2025 10:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).