Cash for Query Case: टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज सीबीआय (CBI) ने महुआ यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआय टीएमसी नेत्याच्या अलीपूर, कोलकाता आणि इतर ठिकाणी असलेल्या निवासस्थानाची झडती घेत आहे.
सीबीआयने शुक्रवारी महुआ मोईत्रा यांच्यावर कॅश फॉर क्वेरी प्रकरणात एफआयआर नोंदवला होता. लोकपालच्या निर्देशानुसार सीबीआयने हा एफआयआर नोंदवला आहे. 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांच्या सर्व पैलूंची चौकशी करण्याचे आदेश लोकपालने मंगळवारी सीबीआयला दिले होते. तसेच या प्रकरणी सहा महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. (हेही वाचा -Mahua Moitra expelled from Lok Sabha: महुआ मोइत्रा यांनी गमावलं लोकसभेचं सभासदस्यत्व; Cash for Query प्रकरणात दोषी)
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महुआ मोईत्रा यांना कॅश फॉर क्वेरी प्रकरणात आपले खासदार पद गमवावे लागले होते. लोकसभेने या प्रकरणात आपल्या नीतिशास्त्र समितीचा अहवाल स्वीकारला होता, ज्यामध्ये त्या कॅश फॉर क्वेरी प्रकरणात दोषी आढळल्या होत्या. (हेही वाचा - Mamata Banerjee on the expulsion of Mahua Moitra: महुआ मोईत्रा सोबत अन्याय झाला; टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी 'भाजपा' वर बरसल्या)
CBI is conducting searches at TMC leader Mahua Moitra's residences and other places in Kolkata and other places in connection with alleged cash for query case.
(File photo) pic.twitter.com/3FtJd19eHX
— ANI (@ANI) March 23, 2024
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. तक्रारीत त्याने म्हटले होते की, महुआने दुबईतील व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून अदानीविरुद्ध संसदेत प्रश्न विचारण्यासाठी रोख रक्कम आणि भेटवस्तू घेतल्या होत्या. तथापि, महुआ यांनी कोणतेही गैरकृत्य नाकारले असून दावा केला आहे की, त्यांनी अदानी समूहाच्या सौद्यांवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे.