पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांना दोषी ठरवत त्यांचं लोकसभेतील सदस्यत्त्व रद्द करण्यात आलं आहे. लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या एथिक्स कमिटीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. लोकसभेने ही शिफारस स्वीकारत त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. त्यामुळे मोइत्रा यांची खासदारकी रद्द झाली आजे.
महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत विचारलेल्या 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न अदानी समूहावर केंद्रित होते. उद्योगपती हिरानंदानी यांनी शपथपत्रात कबूल केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोईत्रा यांनी गौतम अदानी यांना लक्ष्य केले होते. हिरानंदानी यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी तृणमूलच्या खासदाराला पैसे दिल्याचा आरोप होता. Mamata Banerjee on the expulsion of Mahua Moitra: महुआ मोईत्रा सोबत अन्याय झाला; टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी 'भाजपा' वर बरसल्या .
TMC MP Mahua Moitra expelled from the Lok Sabha in 'cash for query' matter.
Ethics Committee report was tabled in the House today. pic.twitter.com/73dSVYFvOb
— ANI (@ANI) December 8, 2023
#WATCH | Cash for query matter | TMC's Mahua Moitra expelled as a Member of the Lok Sabha; House adjourned till 11th December.
Speaker Om Birla says, "...This House accepts the conclusions of the Committee that MP Mahua Moitra's conduct was immoral and indecent as an MP. So, it… pic.twitter.com/mUTKqPVQsG
— ANI (@ANI) December 8, 2023
आज दुपारी एथिक्स कमिटीचा अहवाल लोकसभा पटलावर ठेवण्यात आला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी अहवालाची प्रत मिळाली नसल्याचा आरोप करत चार दिवसांचा वेळ मागितला होता. पण दुपारी 2 वाजता चर्चा सुरू करण्यात आली. यावेळी महुआ मोईत्रा यांना त्यांची बाजू मांडण्याची किंवा बोलण्याची संधी लोकसभेमध्ये दिली नाही. त्या उभ्या राहिल्या होत्या. तृणमूल काँग्रेसने पक्षाकडून त्यांना बोलण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. मात्र अध्यक्षांनी त्याला परवानगी दिली नाही.
महुआ यांनी आर्थिक व्यवहार किंवा गिफ्ट बाबत कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचं म्हटलं आहे. तसेच आपल्यावर झालेली कारवाई ही केवळ पोर्टलचे लॉग इन डिटेल्स शेअर केल्यावरून झाली असल्याची प्रतिक्रिया संसदेच्या बाहेर दिली आहे. आपण यापुढेही संसदेत आणि संसदेच्या बाहेर हा लढा कायम ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान महुआ यांना पाठिंबा देत विरोधकांनी लोकसभेतून वॉकआऊट केले आहे.