सी.के.जाफर शरीफ ( फोटो सौजन्य- ट्विटर )
कॉंग्रेस जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी.के. जाफर शरीफ (C. K. Jaffer Sharief ) यांचे आज दुपारी बंगळरु येथे निधन झाले. सी.के. जाफर शरीफ हे 85 वर्षांचे होते.
गेल्या शुक्रवारी नमाज पठणासाठी सी.के. जाफर गेले होते. मात्र नमाज पठणास जाताना त्यांना दुखापत झाली. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात (ICU)  ठेवण्यात आले होते. या दु:खद घटनेने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तर सी.के. जाफर यांनी 1991 ते 1995 पर्यंत रेल्वे मंत्र्यांचा पदभार सांभाळला होता. तसेच इंदिरा गांधीयांच्या सोबत राजकीय पक्षात राहून राजकरणात त्यांचा सहभाग होता.

सीके जाफर यांना कॉंग्रेस सरकार असताना सन 1991 रोजी रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच 1 जून, 1991 ते 16 ऑक्टोंबर, 1995 पर्यंत रेल्वे मंत्र्यांचा पदभार सांभाळला होता.