बस आणि बोलोरो (Bus-Car Accident) यांच्यात जोरदार धडक झाल्याने 9 जणांचा मृत्यू तर, 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडा (Bhilwara) जिल्ह्यात सोमवारी रात्री घडली. जखमींना जवळच्या महात्मा गांधी रुग्णालयात (Mahatma Gandhi Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सर्व जखमी प्रवाशी हे खंधारा गावातील रहवासीसमजते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील बस ही कोटा जिल्ह्यातून भीलवाडा बस डेपोच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे. तसेच हा अपघात घडल्यामागे नेमके कारण आहे? आणि यात कुणाची चुकी होती? याचा स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहे. यासाठी घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज बघितले जाणार आहे.
रस्ता अपघाताचे प्रमाणात वाढ झाली असून यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. यातच राजस्थान येथील भीषण अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे. बस आणि बोलेरो या दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात 9 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून 15 जण जखमी झाले आहेत. या घटनेतील बस कोटा जिल्ह्यातून भीलवाडा बसडेपोच्या दिशेने जात होती. तर, बोलेरोमध्ये असलेली मंडळी एका विवाह सोहळ्यावरून घरी परतत होती. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सध्या जखमींवर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे देखील वाचा- बेळगाव: ट्रॅक्टर नाल्यात उलटून 8 ऊसतोड कामगारांचा मृत्यू; 30 जण जखमी
एएनआयचे ट्वीट-
Rajasthan: 9 dead and 15 injured after a bus and a Bolero collided with each other in Bigod area of Bhilwara district. The injured have been shifted to hospital.
— ANI (@ANI) February 10, 2020
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गलहोत यांनी दुख व्यक्त केले आहे. या अपघातासंदर्भात गलहोत यांनी ट्वीट केले आहे. यात त्यांनी लिहले आहे की, भीलवाडा परिसरातील अपघात अनेक लोकांनी आपले प्राण गमावल्याची माहिती मिळताच दुख झाले. या अपघाताने मृतांच्या कुटुंबियांवर दुखाचे डोंगर कोसळले असून त्यांना या दुख:तून सावरण्याचे बळ मिळावे, अशी मी प्राथना करतो. तसेच जखमींवर योग्य उपाचार करण्यात यावे, असे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत, असेही गलहोत म्हणाले आहेत.