बेळगाव: ट्रॅक्टर नाल्यात उलटून 8 ऊसतोड कामगारांचा मृत्यू; 30 जण जखमी
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

बेळगाव (Belgaon) लगत आज शनिवारी (8 फेब्रुवारी) एका भीषण अपघातात (Road Accident) आठ ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तसेच या अपघातात 30  जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीमूळे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. Nashik Accident: रिक्षा-बस विहीरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 26 ठार, 32 जखमी; बचावकार्य संपलं

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. खानापूर तालुक्यातील बोगुर गावाच्या बोगुर इटगी रोडवर नाल्यात ट्रॅक्टर उलटल्याने हा अपघात झाला.सर्व मयत बोगुर गावचे राहणारे आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिक (Nashik) शहरामध्ये कळवण मालेगाव रस्त्यावर येथे एक विचित्र रोड अपघात घडला होता. यातही 26 जणांचा मृत्यू झाला होता तर 32 जण जखमी झाले होते. या घटनेत सुद्धा बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याची धडक रिक्षाला बसली. आणि तेव्हाच ही दोन्ही वाहने नजिकच्या विहिरीमध्ये कोसळली होती.