Nashik Accident: रिक्षा-बस विहीरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 26 ठार, 32 जखमी; बचावकार्य संपलं
Nashik Accident (Photo Credits: ANI)

नाशिक (Nashik) शहरामध्ये कळवण मालेगाव  रस्त्यावर झालेल्या विचित्र रोड अपघातामध्ये मृतांची संख्या आता 26 वर पोहचली आहे तर 32 जण जखमी आहेत. काल (28 जानेवारी) संध्याकाळी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याची धडक रिक्षाला बसली. यामध्ये दोन्ही वाहनं नजिकच्या विहिरीमध्ये कोसळली. प्रशासनाला माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. रिक्षामध्ये 9 तर बसमध्ये 48 प्रवासी अडकले होते. मात्र आज सकाळी अखेर प्रशासनाने बचावकार्य संपल्याची माहिती दिली आहे.  मालेगाव: बस आणि रिक्षाच्या धडकेने भीषण अपघात; 5 जण जागीच ठार.  

मालेगावहून कळवनकडे जाणारी कळवण आगाराची ही बस होती. देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेथी फाटय़ानजीक मंगळवारी दुपारी चार च्या सुमारास घडली. जे प्रवासी व कर्मचारी या अपघातात मृत झाले त्यांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तसेच जे प्रवासी जखमी आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री, संसदीय कार्य तथा अध्यक्ष एसटी महामंडळ डॉ. अनिल परब यांनी दिली आहे.

ANI Tweet

  1. रिक्षापाठोपाठ बसही सुमारे 60 फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. रिक्षातील प्रवासी बसखाली दबले गेले. काल सायंकाळी क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आली होती. दरम्यान सध्या राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे.  2019 मध्ये राज्यात जानेवारी ते मार्च दरम्यान तब्बल 9 हजार 96 रस्ते अपघात झाले होते. आता या अपघातांमध्ये वाढ झाली आहे.