Bus Collides in Well In Nashik (Photo Credits: ANI)

नाशिक: मालेगाव (Malegaon) - देवळा रोडवरील मेशी फाट्यानजीक धोबी घाट परिसरात आज मंगळवारी 28 जानेवारी रोजी राज्य परिवहन मंडळाची बस आणि अपे रिक्षामध्ये यांच्या विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहने थेट विहिरीत कोसळल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर, 20 ते 25 जण जखमी झाल्याची दाट शक्यता आहे. ही बस कळवण आगारची असल्याचे समजते. स्थानिकांनी जखमींना तातडीने मालेगांवच्या सामान्य रुग्णालय आणि देवळाच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर पोलीस देखील घटनसातली उपस्थित असून याप्रकरणाचा तपास केला जात आहे, अद्याप मृतांची ओळख मात्र पटलेली नाही. नाशिक: मनमाडमधील चांदवड येथे दुचाकी आणि ट्रेलरचा भीषण अपघात; आई-वडिलांसह 3 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

अपघातस्थळी वर्दळ असल्याने घटना अघडतांहच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतकार्य राबवून जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. यमुनेच अनेकांचे प्राण वाचण्यास मदत झाली. आतापर्यंत केवळ 5 जणांचे मृतदेह सापडले असले तरी अद्याप बचावकार्य सुरु असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ANI ट्वीट

दरम्यान सध्या राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सरकार रस्ते अपघात थांबवण्यासाठी विविध उपक्रम राबवताना दिसते. मात्र, सरकाराला या उपक्रमात यश मिळताना दिसत नाही. 2019 मध्ये राज्यात जानेवारी ते मार्च दरम्यान तब्बल 9 हजार 96 रस्ते अपघात झाले असून या अपघातात 3 हजार 434 लोकांचा जीव गेला आहे.