 
                                                                 Explosion at Illegal Firecracker Unit in Amritsar: पंजाब (Panjab) मध्ये भाड्याच्या मालमत्तेत असलेल्या बेकायदेशीर फटाके उत्पादन युनिट (Illegal Firecracker Unit) मध्ये झालेल्या स्फोटात (Explosion) सात जण जखमी झाले आहेत. अमृतसर (Amritsar) शहरापासून अंदाजे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंदियाला शहरात असलेल्या नागल गुरु गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, भाड्याच्या खोलीत ठेवलेल्या फटाके बनवण्याच्या साहित्याने पेट घेतला. ज्यामुळे संपूर्ण खोलीत आग पसरली. त्यानंतर मोठा स्फोट झाला. पोलिसांच्या अहवालानुसार, स्फोटामुळे सात जण जखमी झाले असून इमारतीच्या भिंतींचे नुकसान झाले आहे. (हेही वाचा -Sun Super Explosion: सूर्यावर एकाच वेळी 4 ठिकाणी भीषण स्फोट, पृथ्वीवर होऊ शकतो गंभीर परिणाम)
तथापी, जखमींवर अमृतसर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरमालकाला या ठिकाणी बेकायदेशीर फटाके बणवण्याचे काम सुरू असल्याची माहिती नव्हती. स्फोटानंतरच त्याला यासंदर्भात माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा - Explosion In Gurugram Factory: हरियाणातील गुरुग्राम येथील फायरबॉल बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; दोघांचा मृत्यू, अनेक कामगार जखमी)
दरम्यान, पश्चिम बंगालमधील पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील कोलाघाट भागातील प्रयाग गावातील एका घरात सुरू असलेल्या बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात जून महिन्यात भीषण स्फोट झाला होता. स्फोटामुळे एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली होती. तसेच या स्फोटात घराचे मोठे नुकसान झाले होते. या स्फोटाचा फटका गावातील शेजारच्या इमारतींना देखील बसला होता.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
