भोपाळ वायू दुर्घटना, 20 व्या शतकातील सर्वात मोठा औद्योगिक अपघात: UN Report
Disabled Children of Bhopal Gas Tragedy (Photo Credit : Pulitzer Center)

1984 साली घडलेली ‘भोपाळ वायू दुर्घटना’ (Bhopal Gas Tragedy), ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण गेले ही 20 व्या शतकातील सर्वात मोठी औद्योगीक दुर्घटना (Industrial Accidents) असल्याचे यूएन (UN) अहवालात म्हटले आहे. यूएनची कामगार एजन्सी (ILO) ने हा अहवाल जारी केला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील युनियन कार्बाईड या अमेरिकी कंपनीच्या रासायनिक कारखान्यातून, सुमारे 30 टन मिथाईल आयसोसायनाईट (Methyl Isocyanate) या अंत्यत विषारी वायूची गळती झाली. या विषारी वायूचा परिणाम तब्बल 6 लाखांहून अधिक लोकांवर झाला.

या अहवालानुसार दरवर्षी 2.78 दक्षलक्ष कामगारांचे मृत्यू हे कामाच्या ठिकाणी अपघात होऊन आणि आजारामुळे होत आहेत. यासाठी कामगारांच्या कामाचे तास आणि त्यांची योग्य ती सुरक्षा न घेणे हे घटक कारानुभूत ठरतात. त्यात गेल्या शतकातील भोपाळ दुर्घटना ही सर्वात भयावह आणि मोठी आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या दुर्घटनेमध्ये तब्बल 15 हजार लोकांचे प्राण गेले होते. मात्र, या विषारी वायूचा फटका बसलेल्या अनेक लोकांना अपंगत्व आले आणि त्यानंतर किती लोक मरण पावले याची गणनाच नाही.

या अहवालात नमूद केलेल्या 1919 नंतरच्या अन्य नऊ प्रमुख औद्योगिक आपत्तींमध्ये चेरनोबिल दुर्घटना, फुकुशिमा आण्विक आपत्ती तसेच राणा प्लाझा इमारत कोसळून घडलेली दुर्घटना यांचा समावेश आहे. (हेही वाचा: मोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर)

भोपाळ दुर्घटना (3 डिसेंबर 1984) –

युनियन कार्बाईड या कंपनीत मिक वायूचा वापर करून सेविन हे कीटकनाशक बनविले जाई. अपघाताच्या पूर्वी दीड महिना अगोदरपासून सेविन बनविणे बंद असल्याने तेथील दोन टाक्यांत असलेला अनुक्रमे 45 टन आणि 15 टन वायू टाकीमध्येच पडून होता. या वायूचा पाण्याशी संपर्क आला तर वायूचे तापमान आणि दाब वाढतो. त्यावेळी या टाकीत पाणी गेल्याने सेफ्टी व्हाल्व्ह उघडली जाऊन वायू बाहेर सुटला, व सरळ हवेत जाऊन वातावरणात पसरला. या विषारी वायुमुळे आतापर्यंत जवळपास 20,000 लोक्नाचा मृत्यू झाला (काही लोक या वायुमुळे झालेल्या विविध आजारांमुळे मृत्युमुखी पडले), तर 5 लाखाहून जास्त जण जखमी अथवा अपंग झाले.