Karnataka Officer Murder case

Government Officer Murder Case:  एक धक्कादायक घटनेने कर्नाटक राज्य हादरलं आहे. कर्नाटकातील भुविज्ञान आणि खणिकर्म वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी परिस्थिती हाताळल्यानंतर पुरव्यानुसार ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे अहवालात म्हटले आहे. महिला अधिकाऱ्याचा पती बाहेर गावी असताना ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी तिच्या बेंगलुरू येथील  घरात घुसून तिची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शांतता पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिकारी महिलेचा पती हा बाहेर गावी गेला होता. तेव्हा काही अज्ञातांनी घरात घुसून तिची चाकून भोसकून हत्या केली. रविवार ही घटना उडकीस आली आहे. बेंगळुरूमधील सुब्रमण्य पुरा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दोड्डाकल्लसंद्राच्या कुवेंपू नगरमध्ये पीडित मुलगी कुटुंबासोबत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भाड्याच्या घरात राहत होती. शनिवारी आणि रविवारी तिच्या भावाने फोन लावला तीनं काहीच प्रतिसाद दिल्या नसल्याने भावाने घरी जाण्याचे ठरवले. घरी गेल्यावर त्याला रक्ताने भरलेला मृतदेह सापडला. या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पोलिसांनी अहवालात म्हटल्याप्रमाणे हल्लेखोर हा महिलेच्या ओळखीचा असावा. तथापि, पोलिस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहे. सर्व सीसीटीव्ही फुजेट तपासण्यात आले आहे. प्रतिमा असं या घटनेत मृत महिलेचे नाव होते. ती ३७ वर्षाची होती. कर्नाटकातील खाण आणि भूविज्ञान विभागातील उपसंचालक होती.