गायीच्या शेणापासून बनवलेले दिवे आणि मूर्ती (PC - ANI)

Punjab: पंजाबमधील (Punjab) मोहाली (Mohali) येथील गौरी शंकर सेवा दल (Gauri Shankar Sewa Dal) या स्वयंसेवी संस्थेने (NGO) दिवाळीसाठी गायीच्या शेणापासून (Cow Dung) मूर्ती तसेच मातीचे दिवे बनविले आहेत. या मूर्तीमुळे विसर्जन करताना कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही. याशिवाय ते खत म्हणून उपयोगात येईल, असं गौरी शंकर सेवा दलाचे संचालक रमेश शर्मा यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आणखी माहिती देताना शर्मा यांनी सांगितलं की, चंदीगड आणि मोहालीमध्ये आमच्या गौशालांमध्ये 1000 गायी आहेत. आम्ही शेणापासून स्टिक्स आणि फुलदाणी तयार करण्याचं ठरवलं. याशिवाय आम्ही शेणापासून गणेशाच्या मूर्तीही बनवल्या आहेत. या मूर्ती विकायचा आमचा हेतू नाही. लोक आमच्याकडे येतात आणि या मूर्ती घेतात. जर त्यांना पैसे द्यायचे असतील, तर आम्ही त्यांना त्या पैशातून गायींना चारा खरेदी करण्यास सांगतो.

दरम्यान, राजस्थानमध्येही काही महिलांनी शेणापासून दिवाळीसाठी दिवे बनवले आहेत. यंदाची दिवाळी इको फ्रेंडली करण्यासाठी गायीच्या शेणापासून दिवे बनवले जात आहेत. याशिवाय छत्तीसगडमध्ये देखील गायीच्या शेणापासून इको फ्रेंडली दिवे बनवले जातात. येथील महिलांनी शेणापासून बनवलेल्या दिव्यांना आकर्षक रंगांची सजावट केली आहे. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यातील ओम, श्री, स्वस्तिक, लहान आकाराच्या मूर्ती, हवन कुंड, अगरबत्ती स्टँड इत्यादी वस्तूचे उत्पादने शेणापासून बनविली जातात. (हेही वाचा - Rules changes from 1st November: आजपासून बदलणार 'हे' नियम, सामान्यांच्या शिखावर होणार थेट परिणाम)

महाराष्ट्रातदेखील दिवाळीसाठी मातीपासून बनवलेल्या दिव्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. हे दिवे लाल किंवा काळ्या मातीपासून बनवले जातात. ग्रामीण भागात साधारणत: प्रत्येक गावात मातीचे दिवे म्हणजेचं पणत्या वापरण्याची पद्धत आहे. या पणत्याची निर्मिती गावातील कुंभार करत असतात. या दिव्यांमुळे कोणत्या स्वरुपाचे प्रदुषण होत नाही.