गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा कोलकाता (Kolkata) येथे नुकताच एनआरसी (NRC) जागरूकता कार्यक्रम पार पडला. अमित शाह यांनी या कार्यक्रमात एनआरसी मुद्दा मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या भारतात आसाम आणि हरियाणा राज्यात एनआरसी लागू करण्यात आली आहे. लवकरच बंगाल (Bengal) येथेही एनआरसी लागू करण्यात येणार आहे. बंगाल येथे एनआरसी लागू झाल्यानंतर निर्वासितांना भारत सोडावे लागणार, असे बोलले जात आहे. परंतु, अमित शाह यांनी ही केवळ अफवा असून एकाही निर्वासिताला भारत सोडावा लागणार नाही, असे विधान केले आहे. एनआरसी लागू होण्याअगोदर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणले जाणार आहेत. त्यानंतरच एनआरसी लागू करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान शहा यांनी अनुच्छेद 370 चा मुद्दा उपस्थित करुन काँग्रेसच्या पक्षावर जोरदार टीकाही केली आहे.
भारतात आसाम आणि हरिणाया या राज्यात एनआरसी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर संपूर्ण भारतातही एनआरसी लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह यांनी कोलकाता येथे एनआरसी जागरुकता कार्यक्रमात एकाही निर्वासिताला भारत सोडवा लागणार नाही, असा दावा केला आहे. बंगालमध्ये एनआरसी लागू झाल्यानंतर हिंदू, शीख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन, अशा निर्वासिताला बंगाल सोडावे लागणार, अशा चर्चांना उधाण आले होते. परंतु नागरिकांनी अशा खोट्या बातम्यांच्या अहारी जावू नये, ही केवळ एक अफवा आहे. एकाही निर्वासिताला भारत सोडावे लागणार नाही असे अमित शाह म्हणाले आहेत. एनआरसी लागू होण्याअगोगर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक तयार केले जाईल, असे त्यावेळी अमित शाह म्हणाले आहेत. हे देखील वाचा- भारतीय बँका सुरक्षित, अफवांना बळी पडू नका; RBI ने केले नागरिकांना आवाहन
ANI चे ट्विट-
Amit Shah in Kolkata: I today want to assure Hindu,Sikh,Jain,Buddhist &Christian refugees, you will not be forced to leave India by the Centre. Don't believe rumours. Before NRC, we will bring Citizenship Amendment Bill, which will ensure these people get Indian citizenship pic.twitter.com/zcWhmL10xl
— ANI (@ANI) October 1, 2019
काँग्रेसच्या सरकारवर टीका करत शाह म्हणाले की, 'श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसला वाटले होते अनुच्छेद 370 मुद्दा संपला आहे. मात्र एका देशात 2 संविधान, 2 पंतप्रधान आणि 2 ध्वज चालणार नाहीत असे म्हणत ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींना आपला जीव गमवावा लागला, त्यांच्या मागणीसाठी आम्ही झटलो. आम्ही भाजपावाले आहोत, एखादा विषय हाती घेतला तर, तो मार्गी लावल्याशिवाय सोडत नाही. जनतेने भाजपचे सरकार आणले. भाजपचे सरकार येताच अनुच्छेद 370 हटवण्यात आले.;