File image of the RBI | (Photo Credits: PTI)

पीएमसी बँके (PMC) पाठोपाठ आता देशातील अनेक बँका बंद होणार असल्याच्या अफवा गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आत देशातील अनेक बँका बंद होणार आहेत, असे ऐकताच नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यावर अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने ट्विट करत भारतीय बँका सुरक्षित आणि स्थिर असून, अफवांना बळी पडू नका असे आवाहन केले आहे. RBI च्या या ट्विट जीव टांगणीला लागलेल्या खातेधारकांचा जीव भांड्यात पडला असेल असच म्हणावं लागेल.

RBI ने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही बँका बंद होणार नसून भारतीय बँका सुरक्षित आणि स्थिर आहे असे सांगितले. तसेच कोणत्याही अफवांना बळी पडून गोंधळून जाऊ नका, असेही RBI ने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील ठराविक भागातील बँका बंद होणार असल्याच्या अफवा गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे अनेक खातेदारांनी घाबरुन जाऊन खाते बंद करण्यास सुरुवात केली होती. ग्राहकांची काळजी आणि भीती लक्षात घेता RBI ट्विट करत ही घोषणा केली आहे. हेही वाचा- PMC बॅंक खातेदारांना RBI ची दिलासादायक बातमी; प्रतिदिन पैसे काढण्याची मर्यादा आता कमाल 10,000 रूपये!

RBI चे ट्विट:

Banking Regulation Act, 1949 च्या अंतर्गत आरबीआयने काही दिवसांपूर्वी पीएमसी बॅंकेवर कारवाई केली होती. त्यामुळे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक (PMC) वर पुढील 6 महिन्यांसाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI)आर्थिक निर्बंध घातले होते. त्यानंतर मुंबईतील अनेक बॅंकांसमोर लांबच लांब रांग लागली होती. आता पैसे काढण्याच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आल्याने सुमारे 60% खातेदार त्यांच्या अकाऊंटमधील सारी रक्कम काढू शकणार आहेत.

पीएमसी बॅंकेच्या खातेदारांना त्यांच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यावर निर्बंध घातल्याने अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच सोसायटींचे देखील कोट्यावधीचा फंड अडकून पडल्याने अनेक नेहमीचे व्यवहार कसे पूर्ण करायचे हा यक्षप्रश्न खातेदारांसमोर होता.