Amarinder Singh Announces To Launch New Political Party: कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा, म्हणाले- मी नवीन पक्ष काढत आहे, सर्व 117 जागांवर निवडणूक लढवणार, नाव सांगू शकत नाही
Captain Amarinder Singh | (Photo Credits: Facebook)

चंदीगड येथे पत्रकार परिषदेत कॅप्टन अमरिंदर सिंग (Amrindar Singh) म्हणाले की होय मी नवीन पक्ष स्थापन करत आहे. आता प्रश्न असा आहे की पक्षाचे नाव काय आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण मला ते माहित नाही. निवडणूक आयोग जेव्हा पक्षाचे नाव आणि चिन्ह मंजूर करेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. कॅप्टनने गेल्या आठवड्यात सांगितले होते की ते लवकरच त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा करतील आणि 2022 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत तीन कृषी कायद्यांबाबत शेतकर्‍यांच्या हितासाठी काही तोडगा निघाल्यास तर  जागावाटपासाठी तयार राहतील. (हे ही वाचा Amrindar Singh Resigns: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा.)

पंजाबचे माजी मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले, “होय, मी नवा पक्ष काढणार आहे. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर चिन्हासह नाव जाहीर केले जाईल. माझे वकील त्यावर काम करत आहेत." ते म्हणाले की, नवज्योतसिंग सिद्धू जिथे लढतील तिथे आम्ही त्यांच्याशी लढू. कॅप्टन अमरिंदर सिंग पुढे म्हणाले की, "वेळ आल्यावर आम्ही सर्व 117 जागा लढवू, मग ते वाटून  जागा लढवून किंवा स्वबळावर लढू.

दरम्यान, ड्रोन हल्ल्यांच्या वाढत्या संख्येमुळे राज्याची सुरक्षा धोक्यात आली आहे, असं कॅप्टन यावेळी म्हणाले. पूर्वी शस्त्रे आणि ड्रग्ज पाठण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात होता, परंतु आता स्फोटके देखील उपकरणांद्वारे पाठवली जात आहे. सीमेवर काहीतरी घडतंय आणि सरकारने त्यावर कारवाई करावी, असे आवाहन सिंग यांनी केले.

चंदीगड येथे पत्रकार परिषदेत कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, मी तिथे असताना या 4.5 वर्षांत आम्ही काय मिळवले याची सर्व कागदपत्रे येथे दिली आहेत. कागद दाखवत ते म्हणाले, “मी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा हा आमचा जाहीरनामा आहे. हा आमचा जाहीरनामा आहे जे आम्ही साध्य केले आहे.” ते म्हणाले की, मी 9.5 वर्षे पंजाबचा गृहमंत्री होतो. 1 महिना गृहमंत्री राहिलेला कोणीतरी माझ्यापेक्षा जास्त जाणतो. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले पंजाबमध्ये आपण अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहोत हे आता आपण समजून घेतले पाहिजे.

चंदीगडमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, सुरक्षा उपायांबाबत ते माझी चेष्टा करतात. माझे प्राथमिक प्रशिक्षण हे सैनिकाचे आहे. मी 10 वर्षांपासून सेवेत आहे त्यामुळे मला मूलभूत गोष्टी माहित आहेत. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांबाबत कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, उद्या आम्ही आमच्यासोबत सुमारे 25-30 लोकांना घेऊन जात आहोत आणि या मुद्द्यावर आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार आहोत.