CRIME | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Tamil Nadu: द्रविड़ मुनेत्र कड़गम (द्रमुक) यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तमिळनाडूमधील एका महिलेने मंदिकात जाऊन आपली जीभ कापली. द्रमुकच्या विजयासाठी या महिलेने देवाला वचन दिले होते. हे वचन पूर्ण करण्यासाठी तिने आज देवाला आपली जीभ अर्पण केली. 32 वर्षांच्या वनिताने 2021 च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकच्या विजयासाठी आपली जीभ देवाला अपर्ण करणार असल्याचं जाहिरपणे सांगितलं होतं.

द्रमुकने विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर वनिता सकाळी मुथलम्मन मंदिरात पोहोचली. तिने जिभ कापून मंदिराच्या देवताला अर्पण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपासनास्थळ कोरोनाशी संबंधित निर्बंधांमुळे बंद आहेत. वनिताने मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जीभ कापली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. (वाचा - West Bengal: नंदीग्राम येथील भाजपच्या ऑफिसवर अज्ञातांकडून हल्ला, तोडफोड करण्यासह आग लावण्याचा प्रयत्न)

बऱ्याच वर्षांनंतर डीएमकेने प्रतिस्पर्धी AIADMK वर तामिळनाडूमध्ये भारी विजय मिळविला आहे. सत्तारूढ पक्ष एक मजबूत विरोधक म्हणून उदयास आला आहे. तमिळनाडूमधील एमके स्टालिन यांच्या नेतृत्वात द्रमुकने स्पष्ट बहुमताने विजय मिळविला आहे. स्टालिन यांच्या नेतृत्वात द्रमुक आघाडीने 151 जागा जिंकल्या आहेत. ते 7 मे रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि AIADMK या दोन प्रमुख राजकीय पक्षांचे मोठे समर्थक आहेत. या पक्षातील नेत्यांना तेथील लोक खूपचं पसंत करतात. जेव्हा 5 डिसेंबर 2016 रोजी एआईडीएमके सुप्रीमो जयललिता यांचे निधन झाले, तेव्हा या धक्क्याने कमीतकमी 30 लोकांचा मृत्यू झाला होता.