West Bengal: नंदीग्राम येथील भाजपच्या ऑफिसवर अज्ञातांकडून हल्ला, तोडफोड करण्यासह आग लावण्याचा प्रयत्न
BJP flags (Photo Credits: IANS)

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणूकीत तृणमूल काँग्रेस पक्षाचा दमदार विजय झाला आहे. मात्र निवडणूकीचे निकाल आल्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी हिंसा सुरु झाला आहे. सोमवारी नंदीग्राम येथे भाजपच्या कार्यालयाची तोडफोड करण्यासह आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर भाजपने आरोप लावत असे म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच हा प्रकार केला आहे.(पराभूत होऊनही जिंकलेल्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री कशा होणार?, जाणून घ्या सविस्तर)

फक्त भाजपचे कार्यालयच नव्हे तर काही दुकाने आणि घरांची सुद्धा तोडफोड करण्यास आग लावण्याचा प्रयत्न केला. भाजपने पुढे असे म्हटले की, तोडफोड केल्यानंतर जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा हल्लेखोर पळून गेले. यामुळे नंदीग्राम बाजारात तणाव वाढला आहे. पश्चिम बंगाल मध्ये जरी तृणमूल काँग्रेसचा विजय झाला असला तरीही नंदीग्राम येथील जागेवर ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. या जागेवर भाजपच्या सुभेंदू अधिकाऱ्यांनी यांनी बाजी मारली आहे.

दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर विविध ठिकाणी हिंसाचार होत असल्याची प्रकरणे समोर आली. रविवारीच बंगाल मधील दुर्गापूरमध्ये भाजपच्या ऑफिसला आग लावण्यात आली. दुर्गापूरमध्ये रात्री भाजपचे ऑफिस जाळण्यात आले. तर दुर्गापूर पश्चिम येथून विजयी झालेले उमेदवार लखन यांनी असा आरोप लावला आहे की, टीएमसीच्या कार्यकर्ते संपूर्ण रात्रभर बाईकवर फिरत होते. त्यांनीच भाजपच्या कार्यकर्त्यांना नुकसान पोहचवले आहे.(West Bengal Assembly Election Results 2021: नंदिग्राम मतदारसंघातील निकालाच्या गोंधळावरून शरद पवारांचं ट्वीट- म्हणाले 'रडीचा डाव')

तर नंदीग्राम मध्ये जनतेला हवा तो निकाल लागला आणि मी त्याचा स्वीकार करते, असं म्हणत ममता बनर्जी यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. पुढे त्या म्हणतात, "नंदीग्रामची चिंता करू नका. मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला कारण मी त्यासाठी एक चळवळ लढविली होती. ठीक आहे. आम्ही 221 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असून भाजप निवडणूक हरला आहे."