राजधानी दिल्लीत (Delhi) कोरोनाचा (Corona Virus) कहर कमी झाला आहे. परंतु या दरम्यान राजधानीमध्ये वेक्टर जनित रोगांचा धोका वाढला आहे. डेंग्यू (Dengue), मलेरिया (Malaria) आणि चिकनगुनिया (Chikungunya) सारख्या आजारांनी दिल्लीच्या लोकांना वेठीस धरले आहे. गेल्या आठवड्यात तीन महानगर पालिकांनी आपापल्या भागात डेंग्यूचे सात रुग्ण आढळले. संपूर्ण दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये डेंग्यूचे 13 रुग्ण आढळले. त्याचबरोबर मलेरिया आणि चिकनगुनियाची आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डेंग्यूची किमान 68 प्रकरणे, मलेरियाची 32 प्रकरणे आणि चिकनगुनियाची 21 प्रकरणे 14 ऑगस्टपर्यंत शहरात नोंदवली गेली आहेत, असे दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने (South Delhi Municipal Corporation) सोमवारी जारी केलेल्या साप्ताहिक अहवालात म्हटले आहे. दक्षिण कॉर्पोरेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की गेल्या आठवड्यात खुल्या जागांमध्ये पाणी साचल्याने आणि डासांच्या प्रजननामुळे प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
ज्यामध्ये तिन्ही महानगर पालिकांच्या आकडेवारीचा समावेश आहे. तपासणी केलेल्या 1.5 कोटी घरांपैकी किमान 72,393 घरांमध्ये लागण झाल्याची नोंद आहे. 63,427 प्रकरणांमध्ये कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि आतापर्यंत 7,832 प्रकरणे सुरू करण्यात आली आहेत. डेंग्यू आणि चिकनगुनियाची प्रकरणे रोखण्यात रहिवाशांची मोठी भूमिका आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येकाने त्यांच्या टेरेस, हिरव्या भागात आणि इतर ठिकाणी डासांची पैदास तपासली पाहिजे.
दरम्यान दिल्लीत काल नव्या 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गेल्या 24 तासात एकही मृत्यू झाला नाही. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 14,37,118 वर पोहोचली आहे. यातील 14 लाख 11 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25,069 जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग दर 0.07 टक्क्यांवर आला आहे. सध्या दिल्लीमध्ये 513 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 287 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. एक दिवसापूर्वीपर्यंत 478 सक्रिय रुग्ण होते. दिल्लीमध्ये सध्या 243 कंटेनमेंट झोन आहेत. हेही वाचा Delta Plus Variant Update: महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ, राज्यात रुग्णांचा आकडा पोहोचला 76 वर
दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रशासन तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ट्रॉमा सेंटरमधील सुविधा वाढवण्यात गुंतले आहे. एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले की, ट्रॉमा सेंटरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन नवीन आयसीयू वार्ड तयार केले जात आहेत. या व्यतिरिक्त, 300 नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफना कोरोना संक्रमित मुलांच्या उपचारासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.