Rourkela Steel Plant (PC - @OrissaPOSTLive)

Odisha Gas Leakage: सोमवारी ओडिशातील (Odisha) सरकारी मालकीच्या सेलच्या राउरकेला स्टील प्लांट (Rourkela Steel Plant) मध्ये गॅस गळती (Gas Leakage) मुळे आठ लोक आजारी पडले. स्टील प्लांटच्या ब्लास्ट फर्नेस 5 येथे ही घटना घडली, असे आरएसपीचे प्रभारी संचालक अतनु भौमिक यांनी सांगितले.

आजारी पडलेल्या आठ जणांना तात्काळ इस्पात जनरल हॉस्पिटलमध्ये (IGH) पाठवण्यात आले, असे अतनु भौमिक यांनी सांगितले. गॅस गळतीमुळे आजारी पडणाऱ्यांमध्ये एक कार्यकारी, एक वरिष्ठ पर्यवेक्षक, दुसरा आरएसपी कर्मचारी आणि काही आउटसोर्स कर्मचारी आहेत. (हेही वाचा - Two died after drowning in Dudhganga river : पावसाळी पर्यटन जीवावर बेतले; कोल्हापुरातील दूधगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू)

अतनु भौमिक यांनी सांगितले की, 'मी त्या सर्वांना भेटलो आणि ते ठीक आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. गॅस पाईप जोडणीचे काम सुरू असताना ही घटना घडली.' (हेही वाचा - Youth Swept Away in Tamhini Ghat: वीकेंडला सहलीसाठी ताम्हिणी घाटात गेलेला तरुण धबधब्यात वाहून गेला; शोधकार्य सुरू)

प्राप्त माहितीनुसार, गॅस गळतीमुळे आजारी पडलेल्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. देखभालीचे काम सुरू असताना गॅस गळती झाल्याने मेंटेनन्सचे कर्मचारी जखमी झाले. आता ताज्या अपडेटनुसार, जखमींची संख्या आठ झाली आहे. सर्व जखमींना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.