Drowning (PC - Pixabay)

Youth Swept Away in Tamhini Ghat: रविवारी लोणावळ्यातील भुशी डॅम  (Bhushi Dam) च्या पाठीमागील धबधब्यात खेळताना एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. ही घटना नवी असतानाचं आता ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा तरुण आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला. हा ग्रुप शनिवारी वीकेंडला सहलीसाठी मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धावडे उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसत आहे. (हेही वाचा -Bhushi Dam Overflow: मोठी बातमी! भुशी धरणामागील धबधब्यात पाच मुले वाहून गेले; शोधकार्य सुरु (Watch Video))

पावसामुळे ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, रोहा-रायगड रेस्क्यू टीम, शिवदुर्ग टीम लोणावळाने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील आढळला नाही. (हेही वाचा - Children Swept Into Bhushi Dam Update: भुशी धरणामागील धबधब्यात वाहुन गेलेल्या 5 जणांचा व्हिडिओ व्हायरल; पहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत या परिसरात शोधकार्य सुरू होते. तथापी, आज सकाळी पुन्हा या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे. स्वप्नील हा पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रहिवाशी आहे.