Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. कच्या तेलाचे दर 86 डॉलच्यावर गेले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ब्रेंट क्रूड 0.22 डॉलर किंवा 0.26 टक्क्यांनी वाढून 86.40 डॉलर प्रति बॅरल आणि डब्ल्यूटीआय 0.15 डॉलर किंवा 0.19 टक्क्यांनी वाढून 80.61 डॉलर प्रति बॅरल झाले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या चढ-उताराचा प्रभाव भारतात दिसलेला नाही. आजही भाव तेच आहेत.

दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 92.76 रुपये दराने विकले जात आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर आहे. (हेही वाचा - Zoom Layoffs: 1300 कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर कंपनी आणखी एक मोठी घोषणा, अध्यक्ष ग्रेग टॉम्ब यांची हकालपट्टी)

इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • जयपूरमध्ये पेट्रोल 108.08 रुपये आणि डिझेल 93.36 रुपये प्रति लिटर आहे
  • हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर आहे
  • पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर आहे
  • लखनौमध्ये पेट्रोल 96.36 रुपये आणि डिझेल 89.56 रुपये प्रति लिटर आहे
  • चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे
  • बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर आहे
  • नोएडामध्ये पेट्रोल 96.69 रुपये आणि डिझेल 89.86 रुपये प्रति लिटर आहे
  • गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.10 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

देशात राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत शेवटचा बदल गेल्या वर्षी मे महिन्यात दिसला होता. त्या काळात केंद्र सरकारने पेट्रोलवर आठ रुपयांनी तर डिझेलवर सहा रुपयांनी उत्पादन शुल्क कमी केले होते.

तेल कंपन्यांकडून कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे कर, डीलर कमिशन आणि वाहतुकीचा खर्च समाविष्ट आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला RSP डीलर कोड एसएमएसद्वारे 92249 92249 वर पाठवावा लागेल, त्यानंतर तुमच्या मोबाईलवर नवीनतम पेट्रोल-डिझेलची किंमत येईल.