Lockdown: महाराष्ट्रातून सलग 3 दिवस प्रवास करून उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये पोहोचलेल्या 60 वर्षीय कामगाराचा (Migrant Worker) वाटेत भूकबळीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एनडीटीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार, या मृत कामगाराने गुरुवारी रात्री महाराष्ट्रातून आपल्या कुटुंबासोबत एका ट्रकवर बसून प्रवास सुरू केला होता.
दरम्यान, रविवारी हा कामगार आणि त्याचे कुटुंब पहाटे उत्तर प्रदेशमधील कनौज जिल्ह्यात पोहोचले. तेथून ते हरदोई जिल्ह्याकडे पायी जाण्यास निघाले. परंतु, एक किलोमीटर चालल्यानंतर या कामगाराचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Lockdown 4 Guidelines: केंद्र सरकारने जाहीर केले लॉक डाऊन 4 चे नियम; जाणून घ्या 31 मे पर्यंत Night Curfew सह कोणत्या गोष्टी सुरु असतील व काय असेल बंद, See Full List)
प्राथमिक तपासातून या कामगाराचा मृत्यू भुकेमुळे झाला आहे. या कामगाराने गुरुवारी प्रवास सुरू केला होता. त्याने शुक्रवारी शेवटचे जेवण केलं होते. त्यानंतर तो केवळ बिस्किट आणि पाण्यावर होता, असं शैलेश कुमार सिंग या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात आतापर्यंत चार वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यात अनेक कामगार अडकले आहेत. परिणामी अनेक कामगारांनी पायी चालत गावाकडचा रस्ता धरला आहे. परंतु, या कामगारांचे रस्त्यांत जेवणाचे हाल होत आहेत. यातील अनेकांचा पायी चालल्यामुळे तर काहींचा भुकेमुळे मृत्यू झाला आहे.