Lockdown 4 Guidelines (संग्रहित संपादित प्रतिमा)

अखेर केंद्र सरकारने अधिकृतरित्या घोषणा करत देशातील कोरोना व्हायरस लॉक डाऊन (Coronavirus Lockdown) 31 मेपर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगितले आहे. सध्या भारतामधील कोरोना विषाणूसंक्रमितांची संख्या 90 हजाराच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र (Maharashtra) राज्य, त्यात मुंबई (Mumbai) शहर हे सर्वात बाधित प्रदेश आहेत. अशात केंद्राचा आदेश येण्यापुर्वीच महाराष्ट्र सरकारने 31 मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला होता. आता केंद्र सरकारने या लॉक डाऊनच्या 4 थ्या टप्प्यात काय सुरु असेल, कोणत्या बाबतीत शिथिलता देण्यात आली आहे, याबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे.

कोरोना विषाणूमुळे देशव्यापी लॉकडाउनचा चौथा टप्पा सोमवारपासून सुरू होईल आणि यामध्ये लोकांना अधिक सवलत मिळणार आहे. देशात सर्व प्रकारची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद राहणर आहेत. यामध्ये देशांतर्गत वैद्यकीय सेवा, घरगुती हवाई रुग्णवाहिकांना सूट देण्यात आलेली आहे.

एएनआय ट्वीट -

काय बंद राहील -

> मेट्रो रेल्वे सेवांवर असलेली बंदी कायम राहील.

> शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था बंद राहतील. ऑनलाईन शिक्षणावर कोणतेही बंधन नाही.

> हॉटेल, रेस्टॉरंट्स, सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल्स, जिम, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर, बार आणि प्रेक्षागृह बंद राहतील.

> सर्व सामाजिक, राजकीय, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

> सर्व सार्वजनिक धार्मिक स्थाने बंद राहतील तसेच धार्मिक मेळाव्यांना पूर्णपणे बंदी घातली आहे.

> कंटेनमेंट झोनमध्ये नियमांचा कडकपणा कायम ठेवला जाईल, येथे फक्त आवश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहतील व फक्त आवश्यक वस्तू ई-कॉमर्सद्वारे मागविता येतील.

कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी या गोष्टी सुरु होतील -

> प्रवासी गाड्या आणि बसेसद्वारे आंतरराज्यीय प्रवास करता येईल. मात्र यासाठी दोन्ही राज्यांची सहमती आवश्यक आहे.

> राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्या-त्या राज्यांच्या नियमांनुसार राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक

> क्रीडा संकुल आणि स्टेडियम उघडण्याची परवानगी असेल; तथापि, प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही.  (हेही वाचा: आता देशातील प्रत्येक जिल्हातून धावणार 'Shramik Special' ट्रेन; जिल्हाधिकारी तयार करणार अडकलेल्या कामगारांची यादी)

लॉकडाउनच्या तिसर्‍या टप्प्यात कोरोना विषाणूच्या बाबतीत देशातील भाग रेड, ग्रीन, ऑरेंज झोनच्या आधारावर विभागला गेला होता. आता लॉक डाऊनच्या 4 थ्या टप्प्यातही हे वर्गीकरण सुरू राहील व हे झोन राज्यसरकार निश्चित करतील.

Night Curfew -

लॉकडाऊनच्या 4 थ्या टप्प्यात सर्व झोनमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणारे लोक सोडून, इतर सर्वांवर संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत बाहेर जाण्यावर बंदी असणार आहे. या टप्प्यामध्ये सरकारने रात्र कर्फ्यू लावला आहे.