Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

दिल्लीत (Delhi) बुधवारी सकाळी एका पाच वर्षांच्या मुलीला तिच्या आईने कथितपणे घराच्या छतावर बांधून ठेवले होते. एका व्हिडिओमध्ये मुलीचे हात आणि पाय दोरीने बांधलेले आणि ती उन्हाच्या चटक्याखाली झुंजत असल्याचे दाखवले आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) सांगितले की त्यांनी कुटुंबाचा शोध घेतला आहे आणि पालकांविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. एका स्थानिकाने शूट केलेल्या व्हिडिओमध्ये, मुलगी स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करताना रडताना दिसत आहे. मदतीसाठी ओरडतानाही ऐकू येत आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की मुलीला शाळेचा गृहपाठ न केल्याबद्दल शिक्षा म्हणून तिला बांधून टेरेसवर ठेवले होते.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ती जवळच्या शाळेत शिकते. संजय सैन, डीसीपी (ईशान्य), म्हणाले, आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची दखल घेतली आणि कुटुंबाचा शोध सुरू केला. आमचे पथक खजुरी खास आणि करवल नगर येथे पथके पाठवण्यात आली. काही वेळाने, एका टीमला पत्ता सापडला. तिथे जाऊन आम्ही पालकांना शोधून काढले. हेही वाचा Murder: दलित मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून 17 वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या, वडिलांना अटक

याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल.  मुलीचे वडील शिंपीचे काम करतात आणि घटना घडली तेव्हा ते बाहेर होते. मुलीची आई गृहिणी आहे. तिची या घटनेबाबत चौकशी केली जाईल. अटक करण्यात आलेली नाही. गुन्हा दाखल करण्यात येत आहे, एका अधिकाऱ्याने सांगितले.