Monkeypox | Representative Image( Pic Credit-ANI)

Monkeypox in Delhi: दिल्लीत मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. 22 वर्षीय संक्रमित आफ्रिकन वंशाच्या मुलीला दिल्लीतील एलएनजीपी (Lok Nayak Jayprakash Narayan Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, नायजेरियन मुलीला मंकीपॉक्सची पुष्टी झाल्यानंतर लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीला सौम्य ताप, तोंडात फोड आणि अंगावर लाल पुरळ आले आहेत. ही तरुणी महिनाभरापूर्वी नायजेरियाला गेली होती. लोकनायक रुग्णालयात दाखल झालेल्या मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या आता चारवर गेली आहे. 17 जुलै रोजी दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता.

एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार यांनी सांगितले की, लक्षणे दिसल्यानंतर महिलेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. जे पॉझिटिव्ह आले आहेत. ही महिला एक महिन्यापूर्वी नायजेरियाला गेली होती. देशातील मंकीपॉक्सची लागण झालेली ही दुसरी मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत सोमवारी मंकीपॉक्सचे दोन नवीन रुग्ण आढळून आले. यापैकी एका रुग्णामध्ये मंकीपॉक्सची पुष्टी झाली. (हेही वाचा - Hand Foot and Mouth Disease: देशात लहान मुलांमध्ये वाढत आहे हात-पाय आणि तोंडाचे आजार; आरोग्य विभाग सतर्क, व्हिडीओमधून जाणून घ्या नक्की काय आहे हा संसर्ग (Watch))

मंकीपॉक्सबाबत दिल्लीतील लोकनायक हॉस्पिटलचे डॉ. सुरेश कुमार म्हणाले की, मंकीपॉक्स हा जीवघेणा आजार नाही. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, शरीराच्या काही भागात लाल पुरळ आणि अशक्तपणा ही त्याची मुख्य लक्षणे आहेत. मंकीपॉक्सची काही सामान्य औषधे घेतल्यावर रुग्ण दोन ते तीन आठवड्यांत बरा होतो.

डॉ. कुमार पुढे म्हणाले की, “मंकीपॉक्सचे चार रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत आणि एका रुग्णाला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. डॉक्टरांची टीम महिलेवर उपचार करत आहे. 24 जुलै रोजी दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता." 23 जुलै रोजी जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सवर जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली. त्याचवेळी, केरळमधील कोल्लम जिल्ह्यात भारतातील मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला.