हरियाणा: आश्रमातील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या स्वयंभू बाबाला अटक
Representational Image (Photo Credits: PTI)

आश्रमात 2 अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार (Rape Case) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना हरियाणा (Haryana) जिल्ह्यातील पंचकुला (Panchkula) येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी स्वयंभू बाबाला अटक करुन पुढील चौकशीला सुरूवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली आश्रममध्ये सेवा करण्यासाठी छोटा त्रिलोकपूरमध्ये गेल्या होत्या. ज्यांच्यावर कथित स्वरूपात आळीपाळीने बलात्कार करण्यात आला आहे. तसेच या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. यातच हरयाणा येथे घडलेल्या प्रकरणामुळे सर्वांच्या भुवाया उंचावल्या आहेत. या घटनेतील आरोपी बाबा स्वामी लक्ष्यानंद पंचकुलाच्या रायपुरानीतल्या त्रिलोकपूर येथे लक्ष्यानंद नावाचा आश्रम चालवतो. स्वामी लक्ष्यानंद प्रत्येक रविवारी स्वत:च्या आश्रमात मोठी गर्दी जमावत होता. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असायचा. दरम्यान, आश्रमात सेवेसाठी आलेल्या 2 अल्वयीन मुलींनी स्वामी लक्ष्यानंद विरोधात पंचकुला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर बाबाविरोधात गुन्हा नोंदवला असून पोलीस वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा करीत आहे, अशी माहिती इंडिया टूडेने दिली आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! अल्पवयीन मुलीला प्रेमात जाळ्यात फसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाला 7 वर्षाची शिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी बाबा यांच्या हालचाली संशयस्पद असल्याचे एका रहिवाशांनी सांगितले आहे. तसेच स्वामी ल स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. याआधी स्वामी लक्ष्यानंदने आश्रमात आणखी काही महिलांना बरोबर असे गैरकृत्य केलेले आहे का? याचाही तपास घेतला जात आहे.