अप्लवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा (Wada) तालुक्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हे प्रकरण विशेष न्यायालयात गेल्यानंतर आरोपीला 7 वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनवण्यात आली आहे. याशिवाय 4 हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. याघटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
राकेश हिरालाल असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. हिरालाल हा मुळचा मध्य प्रदेश असून ठाणे येथे तो एका कारखान्यात नोकरी करत होता. दरम्यान, त्याची पीडितेसोबत ओळख झाली. त्यावेळी हिरालाल याने पडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवल्याची माहिती समोर आली. मार्च 2016 रोजी पीडित मुलीने शाळेत जाण्याचा बहाण्याने घर सोडून हिरालालला भेटली. परंतु, मुलगी घरी न आल्याने पीडिताच्या पालकांनी तिचा शोध घ्यायला सुरूवात केली. त्यावेळी पीडित मुलीच्या आईवडिलांना हिरालालला लिहिलेले एक प्रेम पत्र सापडले. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी स्थानिक पोलिसांकडे हिरालालविरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल केली होती. हे देखील वाचा- जालना: प्रेमी युगुलाला बेदम मारहाण, शिवीगाळ आणि तरुणीचा विनयभंग करून गावगुंड फरार; व्हायरल व्हिडीओमुळे हादरला महाराष्ट्र (Watch Video)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून पळून गेल्यानंतर हे दोघांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले होते. हिरालाल याच्यावर कलम 363 आणि कलम 376 अंतर्गत दंड देण्यात आला आहे. तसेच हिरालालने अल्पवयीन पीडित मुलीला तिच्या पालकांच्या कायदेशीर पालकत्वातून दूर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे कोर्टाचे निरीक्षण आहे.