Charter plane | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

देशात कोरोनाने (Corona) झपाट्याने वेग पकडला आहे. कोविडची रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. Omicron देखील डोक वर केले आहे. दरम्यान, इटली-अमृतसर (Italy-Amritsar) चार्टर्ड फ्लाइटमधील (Chartered flight) सुमारे 125 प्रवासी कोविड कोरोना पॉझिटिव्ह (125 Passengers Corona Positive) आढळले आहेत. हे सर्व प्रवासी अमृतसर विमानतळावर पोहोचले होते. या चार्टर्ड फ्लाइटमध्ये एकूण 179 लोक होते. विमानतळ संचालक व्हीके सेठ (VK Seth) यांनी ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रवासी पंजाबचेच आहेत. विमानतळावर प्रवाशांनीही गोंधळ घातला. प्रवाशांनी आरोप केला आहे की जबरदस्तीने कोरोना पॉझिटिव्ह सांगितले जात आहे.. प्रवाशांनी सांगितले की, त्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस इटलीतून मिळाले होते आणि 72 तासांपूर्वी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

Tweet

गुरुवारी, ओमिक्रॉनने भारतात एकाच दिवसात सर्वाधिक 495 नवीन रुग्ण नोंदवली आहे, ज्यामुळे या स्वरूपातील संसर्गाच्या रुग्णांची संख्या 2,630 झाली. महाराष्ट्रात ओमिक्रॉनची सर्वाधिक 797 प्रकरणे नोंदवली गेली, त्यानंतर दिल्लीत 465, राजस्थानमध्ये 236, केरळमध्ये 234, कर्नाटकात 226, गुजरातमध्ये 204 आणि तामिळनाडूमध्ये 121 रुग्ण आढळले. (हे ही वाचा ओमिक्रॉन डिटेक्टिंग RT-PCR चाचणी किट 4 तासात देणार निकाल, DCGIकडून मिळाली मान्यता - आरोग्य मंत्रालय.)

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात एका दिवसात कोविड-19 चे 90,928 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर, देशातील संक्रमितांची संख्या 3,51,09,286 झाली आहे. सुमारे दोनशे दिवसांनंतर नोंदवलेली ही सर्वाधिक रुग्ण आहेत. यापूर्वी, गेल्या वर्षी 10 जून रोजी संसर्गाची 91,702 प्रकरणे नोंदवली गेली होती.