oxygen (pic credit- ANI)

जेव्हा कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट शिगेला पोहोचली होती. तेव्हा संपूर्ण देशात आक्रोश होता. त्या काळात ऑक्सिजनच्या (Oxygen) अभावामुळे सर्वात मोठी समस्या होती. ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेकांचे प्राणही गेले आहे. परंतु राज्य सरकारने (State Government) अशी कोणतीही आकडेवारी नाकारली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेचा मुद्दा नुकताच संसदेतही (Parliament) उपस्थित करण्यात आला. या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले होते. यानंतर केंद्राने अशा मृत्यूंबाबत राज्यांकडून डेटाची मागणी केली. आता 13 राज्यांनी हा अहवाल केंद्र सरकारला (Central Government) पाठवला आहे. यापैकी 12 राज्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यांच्यामध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झाला नाही.  महाराष्ट्राचाही (Maharashtra) यात समावेश आहे. त्याच वेळी केवळ पंजाबने (Punjab) चार संशयास्पद मृत्यूची कबुली दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले जेव्हा हा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आला. तेव्हा राज्यांना स्पष्टपणे हा प्रश्न विचारण्यात आला होता.  आतापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार केवळ एका राज्याने संशयास्पद मृत्यूचा उल्लेख केला आहे. तर इतर कोणत्याही दुसऱ्या राज्यांने हे स्वीकारायला नकार दिला आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचे अद्याप सांगितले नाही.

यात अरुणाचल प्रदेश, आसाम, ओडिशा, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसह 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले की फक्त पंजाबने म्हटले आहे की ऑक्सिजनच्या अभावामुळे चार संशयित मृत्यू झाले आहेत.

केंद्राने अलीकडेच या वर्षाच्या सुरुवातीला कोविड 19 च्या दुसऱ्या लाटे दरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंविषयी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून डेटा मागितला होता. १३ ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटी ही माहिती गोळा केली. तसेच अधिवेशन संपण्यापूर्वी संसदेत सादर केले.  20 जुलै रोजी राज्यसभेत माहिती दिली नाही. जेव्हा प्रश्न विचारला गेला की कोविड 19 रुग्णांची मोठी संख्या रस्ते आणि रुग्णालयांमध्ये अभावामुळे मरण पावली. दुसऱ्या लाटे दरम्यान ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झाले का?  त्यानंतर त्यांच्या लेखी उत्तरात, आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार म्हणाले होते की आरोग्य हा राज्याचा विषय आहे.
पवार म्हणाले होते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूच्या अहवालासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे प्रकरणे आणि मृत्यूची नोंद करतात. परंतु राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पाठवलेल्या अहवालांनुसार केवळ ऑक्सिजनच्या अभावामुळे कोणताही मृत्यू झाला नाही.