Security forces in Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

जम्मू (Jammu) विभागातील राजोरीमध्ये (Rajori) सुरक्षा दल (Security forces) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक सुरू आहे. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. थानामंडी (Thanamandi) परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवर सुरक्षा दलाचे संयुक्त पथक परिसरात शोधमोहीम राबवत होते. स्वतःला घेरलेले पाहून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. माहितीनुसार 3 ते 4 दहशतवादी जंगल परिसरात आहेत. तसेच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या प्रत्येक गोळीला चोख प्रत्युत्तर देत आहेत. जम्मू -काश्मीरमधील सीमा राजौरी जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी थानामंडी परिसरात शोधमोहीम सुरू केली.

अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. तेव्हा शोध मोहीम चकमकीत बदलली. त्यांनी सांगितले की सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. यात राष्ट्रीय रायफल्सचा एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO) गोळी लागून जखमी झाला. त्या जवानाला ताबडतोब जवळच्या वैद्यकीय सुविधेत हलवण्यात आले. मात्र नंतर त्याच्या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

6 ऑगस्ट रोजी दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी याच परिसरात ठार केले होते. 6 ऑगस्ट रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये राजौरीमध्ये चकमक झाली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाने जिल्ह्यातील थानामंडी वनक्षेत्रात घेराव आणि शोधमोहीम सुरू केली आहे. सुरक्षा दल दहशतवाद्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चकमक सुरू झाली.

दहशतवाद्यांचा एक गट दक्षिण काश्मीरमधून राजोरीला पोहोचला होता. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटना आयईडी लावून जम्मू विभागात हल्ल्यांची योजना आखत असल्याची गुप्तचर माहिती आहे. ज्यात धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचे षडयंत्र आहे. ड्रोनने आयईडी सोडल्याच्या घटनांवरून असे दिसते की पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जम्मूतील धार्मिक स्थळांजवळ गर्दीच्या ठिकाणी स्फोटके लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

याआधीही काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांच्या हवाल्याने पोलिसांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावरील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर गोळीबार केला होता. यापूर्वी 3 ऑगस्ट रोजी जम्मू -काश्मीरच्या बांदीपोराच्या चांदाजी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एका दहशतवाद्याच्या मृत्यूची बातमी होती. काश्मीर झोन पोलीस आणि सुरक्षा दलांनी ही कारवाई केली होती.