WWE रेसलर आणि हॉलिवूडचा सुपरस्टार 'द रॉक' अडकला लग्नबंधनात, सोशल मीडियावर शेअर केले फोटो
The Rock Wedding Photo (Photo Credits: Instagram)

हॉलिवूड (Hollywood) सह जगभरात प्रसिद्ध असा अभिनेता व रेसलर ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) उर्फ द रॉक (The Rock) हा अलीकडेच आपली खूप काळापासूनची गर्लफ्रेंड लॉरेन हशियन (Lauren Hashian) सोबत लग्नबेडीत अडकला आहे. 47 वर्षीय रॉक ने आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवरून याची माहिती देत खास फोटो शेअर केले आहेत. यानंतर काहीच अवधीत त्याच्या फॅन्सने हे फोटो तुफान व्हायरल करून आपला आनंद व्यक्त केला आहे. या फोटोखाली त्याने 'We Do' असे कॅप्शन आहे तसेच यामध्ये लॉरेन ही ख्रिश्चिन पद्धतीच्या पांढऱ्या ब्रायडल गाऊन मध्ये दिसत आहेत, हे फोटो हवाई (Hawai) मधील असून रॉकने १८ ऑगस्टला शेअर केले आहेत. लॉरेन ही एक प्रसिद्ध गायिका, संगीत निर्माती व गीतकार आहे.

पहा रॉक आणि लॉरेनचे ' वेडिंग फोटो'

 

View this post on Instagram

 

We do. August 18th, 2019. Hawaii. Pōmaikaʻi (blessed) @laurenhashianofficial❤️ @hhgarcia41📸

A post shared by therock (@therock) on

('द रॉक'ने लेकीला दिल्या सहा महिने पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा- पाहा व्हिडिओ)

2006 मध्ये रॉक आणि लॉरेन यांची भेट झाली होती, मात्र तेव्हा रॉक हा आपल्या पहिल्या पत्नीसोबाबत होता. २००७ मध्ये त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर यांच्यातील जवळीक वाढू लागली. आता रॉक आणि लॉरेन यांना दोन जस्मिन आणि तियाना नावाच्या दोन मुली सुद्धा आहेत. तब्बल १२ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी अखेरीस लग्न करण्याचा निर्णय घेतला.