Oscar Awards 2024: भारतात 'ऑस्कर 2024'चे लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे होणार? तारीख आणि वेळ घ्या जाणून
Oscar Awards 2024 (PC - Pixabay)

Oscar Awards 2024: जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या ऑस्कर पुरस्कारावर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. त्यात नॉमिनेट झालेल्या व्यक्तिरेखांशिवाय चाहतेही या शोच्या टेलिकास्टची वाट पाहत आहेत. यंदाच्या अकादमी पुरस्कारांची लवकरच घोषणा केली जाईल. 96 व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा आज रात्री अमेरिकेत होणार आहे. तुम्ही भारतात कधी आणि कुठे ऑस्कर (Oscar Awards 2024) चे थेट प्रक्षेपण पाहू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा कुठे होणार आहेत?

ऑस्कर 2024 कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. हा अवॉर्ड शो 10 मार्च रोजी आयोजित केला जाईल, जो जिमी किमेल होस्ट करेल. या सोहळ्यात विजेत्यांची नावे जाहीर केली जातील. याशिवाय सादरकर्त्यांची नावेही जाहीर केली जाणार आहेत. (हेही वाचा -Miss World 2024: चेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिस्कोव्हा जिंकला मिस वर्ल्ड 2024 चा खिताब)

तुम्ही भारतात ऑस्कर कधी आणि कुठे पाहू शकाल?

10 मार्च रोजी कॅलिफोर्नियामध्ये या सोहळ्याचे आयोजन केल्यानंतर तुम्ही सोमवारी, 11 मार्च रोजी भारतात हा शो पाहू शकाल. भारतात पहाटे 4 वाजता हा शो सुरू होईल. हा सोहळा OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केले जाईल. ऑस्कर पुरस्कार तीन फेऱ्यांमध्ये आयोजित केले जातील. यासाठी सादरकर्त्यांचीही तीन फेऱ्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या सेटमध्ये मिशेल फिफर, झेंडाया, निकोलस केज, अल पचिनो, माहेरशाला अली, ब्रेंडन फ्रेझर, जेमी ली कर्टिस, मॅथ्यू मॅककोनाघी, जेसिका लाँग, लुपिता न्योंग, के ह्वी क्वान, मिशेल येओह आणि सॅम रॉकवेल यांचा समावेश आहे.

त्याचवेळी दुसऱ्या फेरीमध्ये ख्रिस हेम्सवर्थ, ड्वेन जॉन्सन, रेजिना किंग, जेनिफर लॉरेन्स, रीटा मोरिनो, जॉन मुल्लाली यांच्या नावांचा समावेश आहे. एमिली ब्लंट, सिंथिया एरियो, अमेरिका फेरारा, रायन गोसलिंग, एरियाना ग्रांडे, बेन किंग्सले हे तिसऱ्या फेरीसाठी सादरकर्ते असतील.

'ओपेनहायमर'ला मिळाली सर्वाधिक नामांकने -

यंदाच्या ऑस्करसाठी नामांकने 23 जानेवारीला जाहीर झाली. 'ओपेनहायमर'ला सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत. या चित्रपटाला एकूण 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. याशिवाय 'बार्बी', 'पूअर थिंग्ज', 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' यासह अनेक चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. याशिवाय भारतीय वंशाच्या कॅनेडियन फिल्ममेकर निशा पाहुजा यांच्या 'टू किल अ टायगर' या चित्रपटालाही नामांकन मिळाले आहे.