वॉर ठरला ह्या वर्षीचा पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
WAR POSTER | (PICTURE CREDIT: INSTAGRAM)

२ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या 'वॉर' या चित्रपटाने सोमवारच्या दिवशी अंदाजे २० कोटींची कमाई केली आहे. रविवारपर्यंत ह्या चित्रपटाने १६६.२५ कोटी कमावले होते. आता ह्या चित्रपटाची एकूण कामे १८६ कोटी झालेली आहे. मंगळवारी असलेल्या दसऱ्याच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला होऊन २०० कोटींचा आकडा पार होईल असा अंदाज आहे.

ह्रितिक रोशन आणि टायगर श्रॉफची जुगलबंदी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ह्या चित्रपटात ह्रितिकने पूर्वाश्रमीच्या तर टायगरने कार्यरत असणाऱ्या रॉ एजन्टची भूमिका साकारली आहे. गांधी जयंतीचं औचित्य साधून प्रदर्शित झालेला हा 'मारधाडपटाला' समीक्षकांकडून जरी संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरीही प्रेक्षकांनी चित्रपटाच्या बाजूने आपला कौल दिला आहे.

जोडून आलेल्या सुट्ट्यांचा फायदा चित्रपटाला झाला आहे. ह्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या पहिल्या आठवड्यातील कमाईच्या बाबतीत 'भारत', 'मिशन मंगल' सारख्या चित्रपटांना मागे टाकत हा चित्रपट आता अग्रस्थानी पोचला आहे आणि येत्या दिवसात कमाईचे काही नवीन विक्रम प्रस्थापित करेल असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही.