Vidya Balan हिची 'अशी' झाली होती इंडस्ट्रीमध्ये एंट्री; अशोक सराफ यांच्यासोबत केली होती पहिली मालिका
Vidya Balan (Photo Credits: Facebook)

विद्या बालन हे बॉलीवूड मधून लोकप्रिय नाव. बॉंग ब्युटी म्हणून जिला ओळखलं जातं अशा विद्याने आजवर अनेक चित्रपट आपल्या अभिनय कौशल्याने गाजवले. भूल भुलैया मधील तिची भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे. पण या बॉंग ब्युटीने तिच्या अभिनयाची सुरुवात केली ती म्हणजे एका टेलिव्हिजन शोपासून आणि तो म्हणजे अशोक सराफ यांचा 'हम पांच'

एकता कपूर निर्मित लोकप्रिय कॉमेडी फॅमिली ड्रामा शो 'हम पांच' हा 90 च्या दशकात खूपच हिट ठरला. यामध्ये अशोक सराफ, शोमा आनंद हे पालकांच्या भूमिकेत दिसायचे तर वंदना पाठक, विद्या बालन, राखी टंडन, भैरवी रायचुरा आणि प्रियंका मेहरा यांनी त्यांच्या पाच मुलींची भूमिका केली होती.

पद्मिनी कोल्हापुरे यांना वयाच्या 15 व्या वर्षी करावा लागला होता रेप सीन; वाचा सविस्तर

या शोमध्ये विद्या बालनने राधिकामाथूरची भूमिका साकारली होती. एक वेंधळी व तितकीच अभ्यासू, मोठा चष्मा लावणारी, श्रवणयंत्र परिधान करणारी राधिका. एकताने विद्याला अभिनयातील पहिला ब्रेक दिला होता.

अशोक सराफ आणि विद्याची ऑनस्क्रीन बाप-मुलीतील केमिस्ट्री प्रेक्षकांमध्ये नक्कीच हिट ठरली.