पद्मिनी कोल्हापुरे यांना वयाच्या 15 व्या वर्षी करावा लागला होता रेप सीन; वाचा सविस्तर
Padmini Kolhapure in Insaf Ka Tarazu (Photo Credits: File Image)

हिंदी सिनेसृष्टीत गाजलेलं एका मराठमोळं नाव म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. अगदी लहानग्या वाट त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली आणि यशाची अनेक शिखरे गाठली. 'इन्साफ का तराजू', 'प्रेमरोग', 'विधाता', 'आहिस्ता आहिस्ता', 'सौतन' यांसारख्या अनेक हिंदी तसेच 'चिमणी पाखरं', 'मंथन' सारख्या मराठी सिनेमांमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

परंतु यशाच्या या प्रवासात त्यांना अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले. त्यातील एका प्रसंग म्हणजे 'इन्साफ का तराजू' या सिनेमात त्यांना करावा लागलेला एका सीन.

वयाच्या 15 व्या वर्षी पद्मिनी यांना रेप सीन करावा लागला होता. त्यांना जेव्हा हे कळलं, तेव्हा ते हा सीन करण्यास अजिबात तयार नव्हत्या. पण नंतर त्यांच्या आईने त्यांची समजूत काढली आणि मग पद्मिनी यांनी हा सीन करण्यास होकार दिला. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं. तसेच पद्मिनी यांनी एका मुलाखतीत कबूल केले होते की त्या रेप सीन नंतर त्या कलाकार म्हणून अधिक समृद्ध झाल्या.

अभिनेत्री लिसा हेडनचे बिकिनीमधील हॉट फोटो सोशल मिडियावर व्हायरल, बेबी बंपमधील आपल्या मुलासोबतचा भावूक फोटो केला शेअर

पद्मिनी आता लवकरच एका मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'प्रवास' या चित्रपटात त्या अशोक सराफ यांच्यासोबत दिसणार आहेत.