अभिनेत्री लिसा हेडनचे बिकिनीमधील हॉट फोटो सोशल मिडियावर व्हायरल, बेबी बंपमधील आपल्या मुलासोबतचा भावूक फोटो केला शेअर
या फोटोमध्ये ती आपले गरोदरपण आपल्या मुलासोबत आणि पतीसोबक एन्जॉय करताना दिसत आहे. आपण पुन्हा आई होणार याची माहिती तिने काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट करुन दिली होती.
'क्वीन' चित्रपटातील आपल्या अफलातून भूमिकेने प्रेक्षकांना वेडं लावणारी अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) दुस-यांदा गरोदर राहिली आहे. सोशल मिडियावर सक्रिय असलेल्या लिसाने आपल्या पहिल्या गरोदरपणासारखे आपल्या दुस-या गरोदरपणाचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यात तिने नुकतेच समुद्रकिनारी हॉट बिकिनीमधील बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. यात खूपच बोल्ड आणि तितकीच क्यूट दिसत आहे. या फोटोमध्ये ती आपले गरोदरपण आपल्या मुलासोबत आणि पतीसोबक एन्जॉय करताना दिसत आहे. आपण पुन्हा आई होणार याची माहिती तिने काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट करुन दिली होती.
लिसा नेहमीच पती आणि मुलासोबतचे फोटो शेअर करत असते मात्र यावेळी तिनं बेबी बंपसोबत बिकिनी फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये लिसाचा मुलगा बेबी बंपला किस करताना दिसत आहे.
हे सर्व फोटो लिसाच्या व्हेकेशनचे आहेत. ज्याठिकाणी ती पती डिनो लालवानी आणि मुलगा जॅक लालवानी यांच्यासोबत क्लालिटी टाइम स्पेंड करत आहे. या फोटोंमध्ये लिसा ब्लॅक बिकिनीमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
हेदेखील वाचा- अभिनेत्री समीरा रेड्डी हिचे पाण्याखालील Baby Bump मधील फोटो सोशल मीडियात व्हायरल (Photo)
लिसानं ऑक्टोबर 2016 मध्ये डिनो लालवानीशी लग्न केलं होतं. त्यानंतर काही दिवसातच तिनं पहिल्या प्रेग्नन्सीची माहिती दिली होती.लिसा 17 मे 2017 मध्ये पहिल्यांदा आई झाली. तिच्या पहिल्या मुलाचं नाव जॅक आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2019 06:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

