अभिनेत्री समीरा रेड्डी हिचे पाण्याखालील Baby Bump मधील फोटो सोशल मीडियात व्हायरल (Photo)
समिरा रेड्डी (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) सध्या प्रेंग्नंट असून तिचे बेबी बंप (Baby Bump) मधील काही फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यापूर्वी सुद्धा समीरा हिचे बेबी बंप मधील फोटो सोशल मीडियात पाहायला मिळाले आहेत. मात्र सर्व बॉलिवूड अभिनेत्रींपैकी प्रथमच समीरा हिने पाण्याखाली बेबी बंपसह फोटोशूट केले आहे. समीराचे हे फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे.

समीरा हिने इन्स्टाग्रामच्या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, मी प्रेंग्नसीच्या 9 व्या महिन्याचा आनंद घेण्यासाठी फार उत्सुक होती. तसेच त्याचा उत्साह व्यक्त करायचा होता. तसेच प्रेग्नंसीबद्दल तिने तिला वाटत असलेल्या भावना पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केल्या आहेत.(बेबी बंप दिसूनही अभिनेत्री करीना कपूर प्रेग्नंट नाही; जाणून घ्या Viral फोटोमागचे सत्य)

तर समीरा नेहमीच सोशल मीडियात सक्रिया दिसून येते. तसेच तिला यापूर्वीसुद्धा एक मुलगा असून त्याच्यासोबतचे फोटोसुद्धा सोशल मीडियात पाहायला मिळाले होते.