झी मराठीवर लवकरच येऊ कशी तशी मी नांदायला (Yeu Kashi Tashi Me Nandayla) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच झी मराठीने मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे. या मालिकेत मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांच्यासह गर्ल्स मराठी चित्रपटात झळकलेली अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या 4 जानेवारीपासून प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे. तसेच ही मालिका कॉमेडी फॅमिली ड्रामाने भरलेली असून प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका 4 जानेवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे. याचाच अर्थ झी मराठीवर 8 वाजता लागणारी मालिका‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही बंद होणार की, अजुन दुसरी कोणती मालिका बंद होऊन इतर मालिकेंच्या वेळेत बदल केला जाईल? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. हे देखील वाचा- Year Ender 2020: सई लोकुर, अक्षय वाघमारे सह 'हे' मराठी सेलिब्रिटी यंदा चढले बोहल्यावर, जाणून घ्या या नवविवाहित जोड्या कोणत्या?
इंस्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
मराठी चित्रपट निर्माता शाल्व किंजवडेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. त्यांनी पहिल्यांदाच एका टीव्ही मालिकेची निर्मिती केली आहे. याआधी त्यांनी हंटर (2015), मेड इन हेवन आणि एक सांगायचय (2018) या चित्रपटाची निर्मिती केली आहे.