Year Ender 2020: सई लोकुर, अक्षय वाघमारे सह 'हे' मराठी सेलिब्रिटी यंदा चढले बोहल्यावर, जाणून घ्या या नवविवाहित जोड्या कोणत्या?
Marathi Celebrities Wedding in 2020 (Photo Credits: Instagram)

यंदाचे वर्ष (Year 2020) कोरोना व्हायरस आणि त्यामुळे आलेले लॉकडाऊन यामुळे अतिशय त्रासाचे आणि उत्साहहीन गेले. या व्हायरसमुळे अनेक शुभकार्ये रखडली. अनेक पुढील वर्षी ढकलण्यात आली आणि जी शुभकार्य झाली ती अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करावी लागली. या वर्षी काही मराठी कलाकारांनी या सर्वाशी सामना करत विवाहबंधनात (Marathi Celebrities Wedding)अडकले. यात अगदी मोजक्या लोकांच्या संख्येत आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करुन हे विवाहसोहळे पार पडले. हे कलाकार चित्रपट, मालिका आणि गायन क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊयात कोणते आहेत हे कलाकार.......

1. शर्मिष्ठा राऊत (Sharmishta Raut)

शर्मिष्ठा राऊत हिने 11 ऑक्टोबरला तेजस देसाई (Tejas Desai) याच्याशी लग्न केले. जुळून येती रेशीमगाठी, कुंपण, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच दे धक्का, फक्त लढ म्हणा, काकस्पर्श या चित्रपटांतही काम केले आहे.

2. अक्षय वाघमारे (Akshay Waghmare)

गँगस्टर अरुण गवळी (Arun Gawli) याची कन्या योगिता गवळी (Yogita Gawli) व अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) हे 9 मे रोजी विवाहबंधनात अडकले.

3. सई लोकुर (Sai Lokur)

बिग बॉस मराठी 1 ची स्पर्धक सई लोकुर हिने 30 नोव्हेंबर रोजी तीर्थदिप रॉय याच्यासोबत लग्न केले. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

4. करण बेंद्रे (Karan Bendre)

अभिनेता करण बेंद्रे (Actor Karan Bendre) आणि त्याची गर्लफ्रेंड निकीता नारकर (Nikita Narkar) 30 नोव्हेंबरलाच विवाहबंधनात अडकले. करण बेंद्रे हा अभिनेता मराठी टेलिव्हिजनवर 'प्रेम पंगा पॉयझन' या मालिकेतून, 'अनन्या' या मराठी नाटकातून रसिकांच्या भेटीला आला होता.

5. कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) 

सारेगमप मराठी लिटिल चॅम्प्सची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड हिचा 10 डिसेंबरला रोनित पिसे याच्याशी मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला.

तर याच वर्षी अनेक मराठी सेलिब्रिटींचे साखरपुडे झाले असून पुढील वर्षी ते विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तसेच मिताली मयेकर यांचा समावेश आहे.