Akshay Waghmare Yogita Gawli Wedding Photos: देशात कोरोना व्हायरस लॉक डाऊन चालू असताना, आज गँगस्टर अरुण गवळी (Arun Gawli) याची कन्या योगिता गवळी (Yogita Gawli) व अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) हे विवाहबंधनात अडकले. मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीत मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला अगदी मोजकेच लोक उपस्थित होते, यामध्ये मुख्यत्वे कुटुंब नी जवळच्या मित्रांचा समावेश होता, मात्र सोशल मिडीयावर अनेकांनी या नावदांपत्याला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या या लग्नाचे होतो सोशल मिडीयाववर व्हायरल होत आहेत.
डिसेंबर 2019 मध्ये योगिता गवळी व अक्षय वाघमारे यांचा साखरपुडा पुण्यात पार पडला. त्यावेळी 29 मार्च रोजी यांचे लग्न होणार असल्याचे समजले होते, मात्र लॉक डाऊनमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर लग्नासाठी 8 मे ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यानुसार आज हा समारंभ पार पडला.
या लग्नासाठी आधीच पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली होती. त्यानुसार लॉक डाऊनच्या नियमांचे अगदी काटेकोरपणे पालन होत हा विवाह सोहळा पार पडला. याआधी योगिता आणि अक्षयच्या हळदीच्या, अक्षयच्या मेहेंदीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. अक्षयने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, आजच्या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. (हेही वाचा: अरुण गवळी याची कन्या योगिता गवळी हिचा अभिनेता अक्षय वाघमारे याच्याशी साखरपुडा)
अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेसांना ओळखत होते, त्यांच्यात चांगली मैत्रिही होती. आता या मैत्रीचे रुपांतर लग्नात झाले आहे. ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’ आणि ‘बस स्टॉप’अशा काही मराठी चित्रपटांमध्ये अक्षय वाघमारे याने अभिनय केला आहे.