'तुझ्यात जीव रंगला' फेम जिजा ऊर्फ अक्षया देवधर ने राणादा सोबतचा एक क्युट व्हिडिओ केला शेअर, म्हणाली 'मालिकेला करतेय Miss', Watch Video
Tujyat Jiv Rangla (Photo Credits: Instagram)

झी मराठी (Zee Marathi) वर सध्या अनेक नवनवीन मालिका पाहायला मिळत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेची एन्ट्री झाल्यानंतर लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' (Tujyat Jiv Rangla) संपविण्यात आली आणि त्या मालिकेच्या जागी संध्याकाळी 6.30 वाजता 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका दाखविण्यास सुरुवात झाली. मात्र अजूनही 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचे चाहते ही मालिका आणि या मालिकेतील कलाकार यांना प्रचंड मिस करत आहेत. विशेष करुन राणादा (Ranada) आणि पाठक बाई (Pathak Bai)... या मालिकेला जितके प्रेक्षक मिस करत आहेत तितकेच या मालिकेचे कलाकार सुद्धा मिस करत आहेत. या मालिकेतील जिजा ऊर्फ अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये जिजा आणि राणादा बनलेला हार्दिक जोशी (Hardik Joshi) एक क्युट कपल डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करुन 'राणादा हा असा आहे' असे सांगत आपण या मालिकेला प्रचंड मिस करत असल्याचे अक्षयाने पोस्टखाली म्हटले आहे.हेदेखील वाचा- Yeu Kashi Tashi Me Nandayla या नव्या मालिकेमुळे आजपासून झी मराठी वर पाहायला मिळणार 'हे' मोठे बदल

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

हा सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मालिकेत शांत, लाजरा दिसणारा राणादा म्हणजेच हार्दिक ऑफस्क्रिन काय धमालमस्ती करायचा आणि आपल्याला किती छळायचा हे अक्षयाने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेने गेली अनेक वर्षे चाहत्यांचे मनोरंजन केले. यातील पाठक बाई, राणादा, लाडू, गोदा आक्का, वहिनीसाहेब हे मात्र अजूनही लोकांच्या मनात घर करून आहेत. मात्र योग्य वेळी त्यांनी ही मालिका संपवल्याने चाहत्यांनीही स्वागत केले. तर अनेकांनी आपण ही मालिका मिस करत असल्याचे या पोस्टखाली म्हटले.