Threat to Jay Bhanushali-Mahhi Vij’s Family : अभिनेता जय भानुशाली आणि माही विजच्या चिमुकलीला जीवे मारण्याची धमकी

काही सिलिब्रेटींची छोटी मुलं सोशल मिडीयावर अगदी ट्रेडींग असतात. तर काही कलाकार मात्र आपल्या चिमुकल्यांना कॅमेरापासून अगदी लांब ठेवताना दिसतात. अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांची दोन्ही मुलं तैमुर  (Taimur)  आणि जाहांगीर (Jehangir) असो वा अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundara) ची मुलं विविन  (Viaan Shetty Kundara) , समिशा (Samisha Shetty Kundara) यांची फोटो कायमच सोशल मिडीयावर ट्रेडिंग असतात. त्याच विरुध्द अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली मात्र अजुनही आपल्या चिमुकलीला लाईमलाईट पासून दूर ठेवताना दिसतात. या मागे विविध कारणे आहेत.

प्रसिध्द टीव्ही अभिनेता Jay Bhanushali आणि Mahhi Vij ही बरेचदा त्याच्या गोडंस मुलीचे फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसतात. जय आणि माहीची मुलगी तीन वर्षाची असुन तिच्याबाबत एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. अभिनेता जय भानुशाली आणि माही विजच्या चिमुकली ताराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे आणि ही धमकी खुद्द त्यांच्या स्वयंपाक्याकडून देण्यात आली आहे.

या दाम्पत्याने स्वयंपाक्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री माहीच्या सांगण्यानुसार, त्या कुकला फक्त तीन दिवसांसाठी एका एजंटमार्फत कामावर ठेवले होते. एजंटने सांगितले की तो त्याच्या कामात चांगला आहे आणि स्वयंपाकानेही आम्हाला सांगितले की त्याच्याकडे एक लहान मूल आहे आणि त्याला नोकरीची गरज आहे. सहसा महिला मदतीसाठी अधिक सोयीस्कर असते, परंतु त्याला गरज होती आणि त्याला एक मूल होत, पालक म्हणून आम्ही त्याला कामावर ठेवले.

कामाच्या तिसऱ्या दिवशी त्त्याने माहीला दारूच्या नशेत कॉल केला आणि फोनवर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तो माहीला आणि संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. संबंधीत सगळे संभाषण फोनवर रेकॉर्ड करुन ओशिवरा पोलिस (Oshiwara Police) स्थानकात  विरोधात एफआयआर दाखल केला. सध्या तो पोलिसांच्या अटकेत असला तरी त्याच्या कुटुंबीयांनी आम्हाला जामीन मिळेल असे सांगितले.

माही आणि जय शुटसंबंधी चार दिवसांसाठी  लंडनला (London) जाणार असल्याने या दामपत्याने त्याच्या चिमुकली तारा बद्दल चिंता व्यक्त केली आहे.