सोनी मराठी वर स्वराज्यजननी जिजामाता (Swarajya Janani Jijamata) या मालिकेमध्ये यंदा शिव जयंती निमित्त एक विशेष भाग प्रदर्शित होणार आहे. या मध्ये 19 फेब्रुवारीला शिवजयंतीचा दिवस साधत 'अफजल खानाचा वध' पहायला मिळणार आहे. दरम्यान प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये आयोजित भेटीत झालेला दगा फटका आणि त्यानंतर महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढून त्याचा केलेला वध हा थरारक प्रसंग पाहता येणार आहे.
अफजल खानाचा वध हा आदिलशाहीवरील एक मोठा अघात मानला जातो. तर हिंदवी स्वराज्यावरील संकट परवताना महाराजांच्या कुशल संघटकाची बाजू, राजनैतिक चातुर्य आणि कपटाला शिताफीने दिलेले उत्तर म्हणून इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. त्यामुळे हा प्रसंग तुम्हांला पहायचा असेल तर तो शिव जयंती निमित्त प्रसारित 19 फेब्रुवारीच्या 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत रात्री साडे आठ वाजता पहायला मिळणार आहे. हा एक तासाचा एपिसोड असेल. नक्की वाचा: Shiv Jayanti 2021 निमित्त छत्रपती सेनेने साकारले 8 फूटी टाक; वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.
कर्तबगारीनं, हुशारीनं, निडर होऊन स्वत:चा जीव धोक्यात घालून स्वराज्य हितासाठी केलेल्या अफजलखान वधाची,
अजरामर यशाची गाथा मांडण्याचा प्रयत्न स्वराज्यजननी जिजामाता मालिकेतून होतोय...
शिवजयंती विशेष
महाएपिसोड १९ फेब्रुवारी रात्री 8:30 वा. @sonymarathitv @neenakulkarni pic.twitter.com/NqZqbFH9Os
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 14, 2021
दरम्यान या मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेते अमोल कोल्हे साकारत आहेत तर जिजाबाईंच्या भूमिकेमध्ये आता नीना कुलकर्णी आहेत. यापूर्वी भार्गवी चिरमुलेने ही भूमिका साकारली होती. महाराष्ट्रामध्ये तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी सरकार कडून शिव जयंती साजरी केली जाते. यंदा कोरोना संकटामुळे शिव जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण या निमित्ताने इतिहासाचा वरसा तुम्हांला पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायचा असेल तर घरात तुमच्या कुटुंबासोबत त्याचे विचार पुढे न्यायला ही एक चांगली संधी आहे.