Bigg Boss 14: सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस च्या घरातून आला बाहेर, इंटरनेटवर लीक झाला Photo
Siddharth Shukla (Photo Credits: Instagram)

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) ची सध्या सर्वत्र हवा आहे. त्याला कारण त्यातले स्पर्धक आणि मुख्य म्हणजे त्यात आलेले माजी स्पर्धक. हीना खान (Heena Khan), गौहर खान (Gauhar Khan) आणि सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांनी या कार्यक्रमाला आणखी थोडे मनोरंजक केले आहे. हा खेळाची त्यांना थोडी माहिती असल्यामुळे त्यानुसार नवनवीन खेळी ते या घरात खेळत आहे. यात बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला तर रोज नवनवीन राडे, धिंगाणे घालत आहे. मात्र आता चाहत्यांना धक्का बसेल अशी बातमी कानावर ऐकायला मिळत आहे. सिद्धार्थ शुक्ला या घरातून बाहेर आला असून त्याचा घराबाहेरील एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे लोकांचा मनातही संभ्रम निर्माण झाला आहे.

हा फोटो पाहून 'जर तो कार्यक्रमाचा एक सदस्य आहे तर तो घराबाहेर कसा काय येऊ शकतो?' असा प्रश्न प्रेक्षक विचारत आहे. तथापि यामागचे खरे कारण अजून समोर आलेले नाही.

हेदेखील वाचा- Naach Meri Rani Song: नोरा फतेही आणि गायक गुरु रंधावा यांचे धमाकेदार गाणे 'नाच मेरी रानी' आले प्रेक्षकांच्या भेटीला, Watch Video

सलमान खान च्या या कार्यक्रमाचा सेट मुंबई फिल्म सिटीमध्ये लावण्यात आला आहे आणि व्हायरल फोटो याच सेटवरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ घराबाहेर फिरताना दिसत आहे. अलीकडेच असे सांगण्यात येत होते की, या शो मधील सिद्धार्थचा घरामध्ये राहण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. याचाच अर्थ सिद्धार्थ आणखी काही दिवस त्याचा चाहत्यांना या शो मध्ये पाहायला मिळणार आहे. अर्थात तो तितका मनोरंजन करणारा असल्यामुळे शो च्या निर्मात्यांना हे सुचले असावे.

सिद्धार्थ शुक्ला पुन्हा एकदा या शोच्या निमित्ताने चर्चेचा विषय बनला आहे. घरात गौहर खान सोबत फ्लर्ट करण्यापासून आपल्या चतुराईमुळे तो लोकांच्या पसंतीस उतरला आहे.